दहशतवाद्यांच्या संपर्कातील तरुण पुणे एटीएस पथकाच्या ताब्यात

लष्कर-ए-तोयबा (Lashkar-E-Taiba) या दहशतवादी (Terrorist) संघटनेच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाला पुणे एटीएस (Pune ATS) पथकाने ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश(Uttar Pradesh)मधील सहारनपूर येथे सदर कारवाई (Action) करत इनामुलला अटक केली आहे.

    जम्मू-काश्मीर(Jammu-Kashmir)मधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद या तरुणाला पुणे एटीएसने यापूर्वी अटक केली होती. आता जुनैद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे पुणे एटीएसने कारवाई करत इनामुल या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

    दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए तोयबासाठी काम करणाऱ्या जुनैद मोहम्मद याला महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून २४ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर बंदी असलेल्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेत भरतीसाठी कार्यरत असलेल्या आफताब हुसेन शाह याला दहशतवादविरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने जम्मू- काश्मीरमधून अटक करण्यात आली होती.