सलमान खान धमकी प्रकरणाचे पुणे कनेक्शन; मुंबई पोलिसांनी केली महाकाळची चौकशी

पंजाबी गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित गुंड सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळची चौकशी करण्यासाठी आज सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाची तुकडी पुण्यात दाखल झाली. महाकाळकडून सलमान खानला मिळालेल्या धमकीबाबत चौकशी करण्यासाठी आणि या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे की नाही याबद्दलचा तपास करण्याच्या उद्देशाने मुंबईहून काही पोलीस अधिकारी पुण्यात दाखल झाले होते. महाकाळ याला बुधवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली(Pune connection of Salman Khan Threat Case; Mumbai Police conducts Mahakal investigation).

    पुणे : पंजाबी गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित गुंड सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळची चौकशी करण्यासाठी आज सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाची तुकडी पुण्यात दाखल झाली. महाकाळकडून सलमान खानला मिळालेल्या धमकीबाबत चौकशी करण्यासाठी आणि या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे की नाही याबद्दलचा तपास करण्याच्या उद्देशाने मुंबईहून काही पोलीस अधिकारी पुण्यात दाखल झाले होते. महाकाळ याला बुधवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली(Pune connection of Salman Khan Threat Case; Mumbai Police conducts Mahakal investigation).

    मुसेवाला याच्या हत्येत महाकाळचे नाव समोर आले आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात २९ मे रोजी मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवाला खून प्रकरणात पंजाब, राजस्थानमधील लाॅरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते.

    मुसेवालावर गोळ्या झाडणाऱ्या दहा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. यात मंचरमधील गुंड संतोष जाधव आणि त्याचा साथीदार असणाऱ्या महाकाळचाही समावेश असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी महाकाळची चौकशी केली.