मनमौजी आणि क्रूरकर्मा शेख भारतात एजंटमार्फत करतात असं काम, एकदा महिला जाळ्यात अडकली की; होतेय…

ओमानमध्ये नरकयातना भोगून नंतर भारतात परतलेल्या स्वर्णजीत कौरचा दावा आहे की, जालंधर, होशियारपूर आणि अमृतसरसह पंजाबमधील अनेक मुली ट्रॅव्हल एजंट्सच्या खोट्या आश्वासनांमुळे ओमानच्या विविध शहरांमध्ये नरकमय जीवन जगत आहेत.

अमृतसर : अरब देशांतील (Arab Countries) अनेक महिला (Women) चांगल्या कामाच्या (Good Work) आणि पैशाच्या लालसेपोटी (Lust For Money) नरकयातनांसारखं (Hellfire) जीवन जगत आहेत. काही जण शेखांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी होतात, पण तरीही मोठ्या संख्येने भारतीय महिला तेथे अडकल्या आहेत (A large number of Indian women are trapped there). असाच एक धक्कादायक खुलासा पंजाबमधील (Punjab) एका महिलेने केला आहे, जिला मोठ्या कष्टाने मायदेशी परतता आले आहे. परतीच्या फ्लाइटमध्ये तिच्यासारख्या जवळपास १२ भारतीय मुली होत्या, त्या सुखरूप घरी परतल्या.

ओमानमध्ये नरकयातना भोगून नंतर भारतात परतलेल्या स्वर्णजीत कौरचा दावा आहे की, जालंधर, होशियारपूर आणि अमृतसरसह पंजाबमधील अनेक मुली ट्रॅव्हल एजंट्सच्या खोट्या आश्वासनांमुळे (Human Traffickers Trap) ओमानच्या विविध शहरांमध्ये नरकमय जीवन जगत आहेत.

चांगल्या पगाराच्या लालसेपोटी स्वर्णजीत डिसेंबर २०२२ पासून ओमानमध्ये अडकून पडली होती. तिला एका ट्रॅव्हल एजंट-कम-‘तस्कर’ने अडकवले. पण राज्यसभा सदस्य संत बलबीर सिंग सीचेवाल यांनी केलेल्या प्रयत्नानंतर ती २८ मार्चला भारतात परत येऊ शकली. स्वर्णजीत कौर यांनी त्यांचे आभार मानले. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या स्वरणजीत कौर, ४१, म्हणाल्या की तिला ओमानमधील तिच्या एजंटने ८०,००० रुपयांना विकले, असे द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. स्वर्णजीत कौरचा दावा आहे की ओमानमध्ये तिच्यासारख्या अनेक दुर्दैवी महिला आहेत, त्या अजूनही तिथेच अडकल्या आहेत.

ट्रॅव्हल एजंटने केली होती ही फसवणूक

पंजाबमधील मोगा येथील रहिवासी असलेल्या कौरचा पती कुलदीप सिंग यांनी सांगितले की, ट्रॅव्हल एजंटने पत्नीला दुबईत घरगुती नोकरी देण्याच्या बहाण्याने मस्कतला नेले होते. कौरने सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी घरातील आर्थिक अडचणींमुळे मस्कतला निघून गेले होते. त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. तिने सांगितले की, तिचा नवरा रोजंदारीवर काम करतो.

कौर म्हणाली- “एजंटने मला घरगुती कामासाठी विकल्यानंतर मला अनेक तास घरची कामे करण्यास भाग पाडले गेले. मी आजारी पडले आणि मला पंजाबला परत यायचे होते, पण ट्रॅव्हल एजंटने परवानगी दिली नाही. माझ्याकडे परतीचे तिकीटाचे पैसेही नव्हते. कसे तरी भारतीय दूतावासात पोहोचण्यात यश आले. आणि मग गोष्टी सुकर झाल्या”

अशी करून घेतली सुटका

सीचेवाल यांच्याशी तिच्या पतीने चंदीगड येथील वकील गुरबीज सिंग यांच्यामार्फत संपर्क साधला होता. मस्कत येथील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून सीचेवाल यांनी त्यांना तिकीट पाठवले, परंतु भारतीय दूतावासाने त्यांना कोणत्या कारणास्तव परत पाठवले नाही. त्यानंतर सीचेवाल यांनी हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयाकडे (MEA) नेले. मस्कतमधील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या अव्यावसायिक वर्तनाचा दाखला देत त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. सीचेवाल म्हणाले की, जेव्हा त्यांनी हे प्रकरण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे मांडले तेव्हा त्यांनी त्यावर तात्काळ कारवाई केली आणि स्वरणजीत कौर यांना परत आणण्याची व्यवस्था केली.

गरीब कुटुंबातील महिलांची फसवणूक

सीचेवाल म्हणाले की, पंजाबमधील गरीब कुटुंबांच्या गरीब आर्थिक स्थितीचा गैरफायदा घेऊन अरब देशांमध्ये फसवणूक केली जाते. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने या कुटुंबांची लूट केली जाते. वैध परवान्याशिवाय बेकायदेशीर इमिग्रेशनचा व्यवसाय चालवणाऱ्या ट्रॅव्हल एजंट्सवर कठोर कारवाई करण्याचे आवाहनही राज्यसभा सदस्याने पंजाब सरकारला केले आहे.