रायगड बोट प्रकरणाचा तपास एटीएसकडे, विनीत अग्रवाल घटनास्थळी दाखल; तपास सुरू

बोटीमध्ये एके ४७ रायफल्स आणि दारुगोळा (AK 47 Rifles and Ammunition), तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे निदर्शनास आली. पोलीस प्रशासनाने तत्काळ रायगडच्या किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश दिले. त्यानुसार रायगड जिल्ह्याच्या लगत असणाऱ्या मुंबई-पुणे-रत्नागिरी (Mumbai Pune Ratnagiri) या सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट (High Alert) घोषित करण्यात आला.

  श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील (Shrivardhan Taluka) हरिहरेश्वर (Harihareshwar) येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास दुर्घटनाग्रस्त बोट स्थानिकांच्या निदर्शनास आली. स्थानिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर बोटीची पूर्ण तपासणी (Checking) करण्यात आली. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे (ATS) देण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल (ATS Chief Vineet Agarwal) घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

  बोटीमध्ये एके ४७ रायफल्स आणि दारुगोळा (AK 47 Rifles and Ammunition), तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे निदर्शनास आली. पोलीस प्रशासनाने तत्काळ रायगडच्या किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश दिले. त्यानुसार रायगड जिल्ह्याच्या लगत असणाऱ्या मुंबई-पुणे-रत्नागिरी (Mumbai Pune Ratnagiri) या सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट (High Alert) घोषित करण्यात आला.

  या बोटीचे नाव लेडीहन असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉर्डरगन या महिलेची आहे. बोटीचा कॅप्टन लॉर्डरगन तिचा पती आहे. लेडीहान बोट दि. २६ जून रोजी सकाळी १०च्या सुमारास इंजन निकामी झाल्याने बोटीमधील खलाशांची कोरियन युद्धनौकेने सुटका केली. सर्व खलाशांना ओमानला सुपूर्त करण्यात आले. समुद्र खवळलेल्या अवस्थेत असल्या कारणाने बोटीला टोईंग करता आले नाही. त्या कारणास्तव बोट भरकटली.

  समुद्रातील अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत बोट हरेश्वर किनाऱ्यावर आली. सुरक्षा यंत्रणेच्या वतीने सखोल चौकशी अंती दुर्घटनाग्रस्त बोट ऑस्ट्रेलियन असून दुर्घटनेच्या कारणास्तव समुद्राच्या प्रवाहासोबत कोकण किनारपट्टीला लागल्याचे सांगण्यात आले, मात्र पोलीस प्रशासन व सुरक्षा यंत्रणेकडून नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सांगण्यात आले आहे.

  १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांची आठवण

  श्रीवर्धन-हरिहरेश्वर समुद्रकिनारी शस्त्रास्त्रांनी भरलेल्या बोटीमुळे नागरिकांमध्ये १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या आठवणींनी भीतीचे वातावरण पसरले. १९९३ साली श्रीवर्धनमधील शेखाडी मध्ये मोठ्या प्रमाणात आरडीएक्स सापडले होते. त्यानंतर मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात शेकडो नागरिकांचा बळी गेला होता. तर हजारो नागरिकांना अपंगत्व आले होते. त्यानतंर २००८ साली समद्रमार्गेच मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या पार्श्वरभूमीवर रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला असून ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे.

  कोकणचे महानिरीक्षक संजय मोहिते श्रीवर्धनमध्ये

  विशेष बाब म्हणजे सध्या सागरी सुरक्षा अभियान सुरु आहे. एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल हे रायगडमध्ये पथकासह दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे कोकणचे महानिरीक्षक संजय मोहिते श्रीवर्धनच्या दिशेने रवाना झाले आहेत. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दयानंद गावडे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदरची बोट भरकटत आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र भारतीय हद्दीमध्ये बोट येत असताना कोणत्याच यंत्रणेला याबाबत माहिती कशी मिळाली नाही. त्यांच्याकडून पेट्रोलिंग झाले नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. जिल्ह्यात अतिसावधगिरीचा इशारा जारी करण्यात आला आहे.

  -डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हाधिकारी