
पोलिसांच्या तपासादरम्यान एअर होस्टेसच्या हत्या प्रकरणात इमारतीमध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या इसमाला पवई पोलिसांनी ताब्यात घेतलं
मुंबई : काही दिवसापासून मुंबईत गुन्हे (Mumbai Crime) घडण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. काही दिवसापुर्वी मुलींच्या वसतिगहात विद्यार्थीनीची हत्या करण्यता आली होती. आत अंधेरी (Andheri Crime News) परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पवई (Powai) परिसरात 23 वर्षीय एअर होस्टेसची (Air Hostess) हत्या (Murder) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केलं असून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरातील मरोळ मारहाव रोडवर असलेल्या एन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका मुलीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही मुलगी ट्रेनी एअर होस्टेस होती. रुपल ओगरे असं तिचं नाव. रुपल तिच्या बहिण आणि मित्रासोबत राहत होती, परंतु ते दोघे गावाला गेले होते. एअर होस्टेस रुपल ओगरे घरात एकटीच असताना तिची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पवई पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी चार पथकं तयार करण्यात आली.
एक जण ताब्यात
पोलिसांच्या तपासादरम्यान एअर होस्टेसच्या हत्या प्रकरणात इमारतीमध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या इसमाला पवई पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशीअंती हत्येचं मूळ कारण समोर येईल.