हनुमानगडाच्या मठाधिपतींवर बलात्काराचा गुन्हा; ग्रामस्थांकडून बेदम मारहाण

जामखेड तालुक्यातील घुगे वस्ती येथे महादेव मंदिराचे बांधकाम सुरू आहे. ते पाहण्यासाठी खाडे महाराज २९ जुलैला गेले होते. त्यावेळी बाजीराव गीते यांनी महाराजांना घरी येण्याचे निमंत्रण दिले. पहाटेच्या सुमारास बाजीराव गीते, भिवा गोपाळघरे, अरुण गीते, राहुल संपत गीते, रामा गीते यांनी मारहाण करून अंगावरील १३ लाख ६० हजार रुपयांचे दागिने लुटल्याची फिर्याद महाराजांनी खर्डा पोलीस ठाण्यात दिली आहे.

    बीड : पाटोदा तालुक्यातील अंमळनेरजवळील हनुमानगडाचे (Hanuman Gad) मठाधिपती बुवासाहेब जिजाभाऊ खाडे महाराज (Mathadhipati Buwadaheb Jijabhau Khade Maharaj) यांच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार (Rape) केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. हा गुन्हा नोंद झाल्यावर महाराजांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण (Brutal Beating) केली. यात गंभीर जखमी झालेल्या महाराजांवर पुणे (Pune) येथे उपचार सुरू आहेत. खर्डा (ता. जामखेड) पोलीस ठाण्यात दोन गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, मारहाण करून साडेतेरा लाख रुपये लुटल्याची तक्रार महाजारांनी यापूर्वी दिली होती. तसा गुन्हा नोंद झाला आहे.

    जामखेड तालुक्यातील घुगे वस्ती येथे महादेव मंदिराचे बांधकाम सुरू आहे. ते पाहण्यासाठी खाडे महाराज २९ जुलैला गेले होते. त्यावेळी बाजीराव गीते यांनी महाराजांना घरी येण्याचे निमंत्रण दिले. पहाटेच्या सुमारास बाजीराव गीते, भिवा गोपाळघरे, अरुण गीते, राहुल संपत गीते, रामा गीते यांनी मारहाण करून अंगावरील १३ लाख ६० हजार रुपयांचे दागिने लुटल्याची फिर्याद महाराजांनी खर्डा पोलीस ठाण्यात दिली आहे.

    महाराजांच्या फिर्यादीनुसार बुधवारी (३ ऑगस्ट) संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. दुसऱ्याच दिवशी गावातील महिलेने महाराजांविरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची फिर्याद दिली. १२ जुलैला बुवासाहेब खाडे महाराजांनी अत्याचार केल्याचे पीडितीने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर महाराजांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. त्यात महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत.