आयुर्वेदिक बॉडी मसाज देण्याच्या बहाण्याने परदेशी महिलेवर बलात्कार

राजस्थानमधील जयपूर येथील सिंधी कॅम्पजवळील एका हॉटेलमध्ये आयुर्वेदिक बॉडी मसाज देण्याच्या बहाण्याने बलात्कार झाल्याचा आरोप एका 31 वर्षीय डच महिलेने केला आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. आरोपी बिजू मुरलीधरनला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आरोपी हा मूळचा केरळचा रहिवासी असून तो शहरातील खातीपुरा भागात भाड्याच्या घरात राहत होता, असे पोलिसांनी सांगितले(Rape of a foreign woman under the pretext of giving Ayurvedic body massage).

    जयपूर : राजस्थानमधील जयपूर येथील सिंधी कॅम्पजवळील एका हॉटेलमध्ये आयुर्वेदिक बॉडी मसाज देण्याच्या बहाण्याने बलात्कार झाल्याचा आरोप एका 31 वर्षीय डच महिलेने केला आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. आरोपी बिजू मुरलीधरनला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आरोपी हा मूळचा केरळचा रहिवासी असून तो शहरातील खातीपुरा भागात भाड्याच्या घरात राहत होता, असे पोलिसांनी सांगितले(Rape of a foreign woman under the pretext of giving Ayurvedic body massage).

    आरोपीने सिंधी कॅम्पजवळील हॉटेलमध्ये आयुर्वेदिक मसाज देताना महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने सिंधी कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी बिजू मुरलीधरन याला अटक केली.

    मूळचा केरळचा रहिवासी असलेला मुरलीधरन येथील खातीपुरा भागात भाड्याच्या घरात राहतो. पीडिता ज्याठिकाणी तिच्या कुटुंबीयांसोबत थांबली होती, तिथे तिने आरोपीला आयुर्वेदिक मसाजसाठी बोलावले होते.