जबरी चोरीचा प्रकार उघडकीस ; एकजण गंभीर जखमी तर तीन हल्लेखोरांना अटक

भोसरीत जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एकजण गंभीर झाला असून याप्रकरणी तीनही हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी:  भोसरीत जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एकजण गंभीर झाला असून याप्रकरणी तीनही हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजू तांदळे (वय 33, रा. लांडेवाडी भोसरी) यांनी ही फिर्याद दिली आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, साई डिजिटल वजनकाटा समोर शांतीनगर कॉर्नर, लांडेवाडी, भोसरी येथे जून 20 रोजी फिर्यादी यांचा मित्र विकी थोरात यांने फिर्यादीला त्यांच्या गाडीजवळ थांबण्यास सांगितले. दरम्यान पाठीमागून आलेल्या लाल रंगाच्या होंडा स्टनर (नंबर प्लेट नसलेली ) वरील तीन अनोळखी इसमापैकी गाडी चालवणाऱ्या इसमाने फिर्यादीस पत्ता विचारण्याच्या बहाणा केला.
    त्यावेळी गाडीत बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या हातातील 5,000 रुपये किंमतीचा एमआय कंपनीचा मोबाईल, 1200 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावले तसेच फिर्यादीची 15,000 रुपये किंमतीची हिरो होंडा पॅशन प्लस मोटरसायकल एमएच14एआर 2698 सुद्धा चोरून नेली. दरम्यान, तिसऱ्या इसमाने फिर्यादी यांच्या डाव्या खांद्यावर व डाव्या हाताच्या पंज्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी अनोळखी इसमांविरोधात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम 394, 34, आर्म ऍक्ट 4(25) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37(1) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.