४ मुलांची विधवा आई प्रियकराच्या प्रेमात आकंठ बुडाली, प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या ; आता पोलिसांचं सुरू आहे ढुंडो- ढुंडो रे साजना ढुंडो

प्रकरण उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे आहे. माघी जत्रे दरम्यान मध्यप्रदेशातल्या रीवा येथील एका ४५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली होती. रविवारी मध्यरात्री माघ जत्रा परिसरात ही खळबळजनक घटना घडली. सुनीता वर्मा असे या महिलेचे नाव आहे. घटनेनंतर महिलेचा प्रियकर फरार झाला आहे.

    रीवा : प्रेमात फसवणूक (Cheating In Love) आणि नंतर त्याचा भयानक अंत (Terrible Ending) झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. प्रयागराज (Prayagraj) येथून असेच एक प्रकरण समोर आले आहे, यात रीवा (Reva) येथील एक महिला (Woman) पतीच्या मृत्यूनंतर (After Husband Death) एका पुरुषाच्या प्रेमात पडली. चार मुलांची आई, जिच्याशी त्याचे संबंध होते, त्याच प्रियकराने किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तिची हत्या (Murder) केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आपल्या प्रेयसीचे डोळेही काढले होते.

    प्रकरण उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे आहे. माघी जत्रेत रीवा येथील एका ४५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली होती. रविवारी मध्यरात्री माघ जत्रा परिसरात ही खळबळजनक घटना घडली. सुनीता वर्मा (Sunita Varma) असे या महिलेचे नाव असून, मारेकऱ्याने मृतदेहाचा चेहरा अक्षरक्ष: विद्रूप करून ठेवला होता.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्याने सुनीताचा एक डोळाही काढला होता. गेल्या तीन वर्षांपासून तिच्यासोबत राहणाऱ्या मनीष यादव (Manish Yadav) याच्यावर हत्येचा आरोप आहे. गुन्हा केल्यानंतर तो फरार (Missing) झाला आहे. प्रयागराजचे दारागंज पोलीस (Daraganj Police of Prayagraj) रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेत होते.

    पोलिसांत नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, सुनीता ही मूळची रीवा येथील दुग्मा थाना मौगंज या गावातील रहिवासी होती. २०२० मध्ये तिचा पती अचेलाल यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यांना दोन मुले आणि दोन मुली अशी चार मुले आहेत.

    ती सध्या तिची सर्वात धाकटी ६ वर्षांची मुलगी दामिनीसोबत माघ जत्रा परिसरात राहत होती. कौशांबीतील करारी येथील मनीष यादव हाही त्यांच्यासोबत येथे राहत होता. दोघेही काम करायचे. रविवारी रात्री उशिरा मनीष आणि सुनीता यांच्यात कशावरून वाद झाला. त्यानंतर मनीषने सुनीताची हत्या केली.