धक्कादायक! 65 वर्षीय वृद्धाचा खून करून दरोडेखोरांनी लुटला लाखांचा ऐवज

लच सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे सशस्त्र दरोड्याची दुसरी घटना उघडकीस आली होती आणि आता काल घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

    नाशिक : नाशिक शहर पुन्हा सशस्त्र दरोड्याच्या घटनेनं हादरलं आहे. अंबड लिंक रोड परिसरात एका घरात दरोडा टाकत दरोडेखोरांनी घरातील ऐवज लुटून नेला. तसेच यावेळी घरात असलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा खून ही केला. या घटनेनं परिसरात भितीचं वातावरण आहे.

    नाशिकच्या अंबड लिंक रोड परिसरातील रहिवासी असलेले कर्डिले यांच्या घरी ही घटना घडली. काल (25 नोव्हेंबर) सायंकाळी जगन्नाथ कर्डिले (वय, 65) हे घरात एकटेच होते. त्यावेळी दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. कर्डिले यांनी काही संशयास्पद हालचाली जाणवू लागताच, त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर तोंड बांधलेले काही दरोडेखोर असल्याचे समजले. त्यामुळे कर्डिले यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानतंर त्यांच्या घरातील सुमारे सहा ते सात लाखांची रोकड लंपास केल्याची माहित समोर आली आहे.

    नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत दरोड्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे शहारातील नागरिकांमध्ये सध्या भितीचं वातावरण आहे. कालच सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे सशस्त्र दरोड्याची दुसरी घटना उघडकीस आली होती आणि आता काल घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.