Shocking! वावड्या उठल्या, झाला गोंधळ आणि दोघांना केली मारहाण…कारण वाचल्यावर तुम्हालाही बसेल धक्का

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वावड्या उठत आहेत. त्यातूनच काही अनपेक्षित घटनाही घडतात. नाशिकमध्ये मुलं चोरीच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक प्रत्येकाकडेच संशयाच्या नजरेने पाहात आहेत.

    नाशिक: एका गाडीतून पैशांची बॅग (Money Bag) घेऊन पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना मुलं चोर (Abducts Children) असल्याचे समजून स्थानिक नागरिकांनी (Local Peoples) बेदम मारहाण केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी वेळेत पोहोचून दोघांना वाचवले असून त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (District Hospital Nashik) दाखल करण्यात आले आहे.

    सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात वावड्या उठत आहेत. नाशिकमध्ये मुलं चोरीच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक प्रत्येकाकडेच संशयाच्या नजरेने पाहात आहेत.

    आज सकाळी गंजमाळ परिसरात (Ganjmal Area) दोघे एका गाडीच्या नंबर प्लेटवर रंग टाकून गाडीत असलेली बॅग घेऊन पळ काढण्याच्या तयारीत असताना एका वाहनचालकाच्या ते निदर्शनास आले. त्यानंतर त्याने चोर-चोर अशी आरडाओरड केली. त्यामुळे समोरच असलेल्या पंचशील नगर झोपडपट्टीकडे हे दोघेही पळाले.

    परिसरातील लोकांनी चोर चोर ऐकून मुलं चोर असल्याचे समजून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी वेळेत घटनास्थळी जाऊन दोन संशयितांना लोकांच्या तावडीतून सोडवून त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हे दोघे भाऊ असून ते मूळचे औरंगाबादचे रहिवासी आहेत. साहिल लक्ष्मीकुंठे आणि प्रभास लक्ष्मीकुंठे अशी या दोघांची नावे आहेत.

    काही दिवसांपूर्वीही अशीच एक घटना घडली होती. ब्लँकेट विकणाऱ्या इसमांना टाकळी रोड येथे मुलं चोरणारी टोळी असल्याचे समजून त्यांना बेदम चोप देण्यात आला होता. पोलिसांनीही सोशल मीडिया तसेच प्रसार माध्यमांतून शहरात कुठलीही मुलं चोरणारी टोळी सक्रिय नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे.