
आपल्या मित्राला अचानक पैशांची गरज असल्याचे पीडित व्यक्तीला वाटले आणि त्याला मदत करण्याच्या उद्देशाने पैसे ट्रान्सफर केले. यानंतर, जेव्हा मित्राने कोणतेही पैसै मागितले नसल्याचे सांगितले तेव्हा पीडित व्यक्तीला या घोटाळ्याचा सुगावा लागला.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आजकाल खूप चर्चेत आहे आणि सामान्य इंटरनेट युझर्सना ते सहज उपलब्ध होत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने काही लोकांचे जीवन सुसह्य झाले आहे, तरी त्याचा गैरवापर करणारे महाभाग आहेतच. चीनमधून समोर आलेल्या एक प्रकरणानंतर, लोकांची फसवणूक करण्यातही लोकं AI चा वापर करत असल्याचं स्पष्ट होत आहे. चीनमध्ये एका व्यक्तीने AI च्या मदतीने आपल्याच मित्राचा चेहरा तयार केला आणि त्याच्या नावावर तब्बल 5 कोटी रुपये लुबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, उत्तर चीनमधील एकाने फेस-स्वॅपिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने मित्राचा चेहऱ्याची कॉपी करत हुबेहुब त्याच्यासारखा चेहरा बनवला. आणि त्याने एका व्यक्तीला पैशाची मदत असल्याचं त्या व्यक्तीनेला आपल्या मित्राचा चेहरा पाहिल्यानंतर पैशाची गरज असल्याची खात्री पटली आणि संपूर्ण कथा खरी असल्याचे मानून 5 कोटी एव्हढी मोठी रक्कम हस्तांतरित केली. नंतर मात्र, तो तिचा मित्र नसल्याचे उघड झाले. उलट कोणीतरी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने त्याच्या पायखालची जमीनच सरकली.
व्हिडिओ कॉलवर मागितले पैसे
बाओटो शहराच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्याने, पीडित व्यक्तीला त्याचा मित्र असल्याचे दाखवून, व्हिडिओ कॉल केला आणि त्याला लवकरात लवकर त्याच्या खात्यात 43 लाख युआन (सुमारे 5 कोटी रुपये) हस्तांतरित करण्यास सांगितले. आपल्या मित्राला अचानक पैशांची गरज असल्याचे पीडित व्यक्तीला वाटले आणि त्याला मदत करण्याच्या उद्देशाने पैसे ट्रान्सफर केले. यानंतर, जेव्हा मित्राने कोणतेही पैसै मागितले नसल्याचे सांगितले तेव्हा पीडित व्यक्तीला या घोटाळ्याचा सुगावा लागला.
पोलीसांचा पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न
या प्रकरणातील हस्तांतरित केलेल्या मोठ्या रकमेपैकी मोठी रक्कम हस्तगत करण्यात आला असून उर्वरित रक्कम परत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच पीडितेला व्हिडीओ कॉल कोठून करण्यात आला हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: चीनमध्ये असे घोटाळे वाढले आहेत आणि एआयच्या मदतीने फसवणूक अधिक तीव्र झाली आहे. आगामी काळात अशा धमक्या आणि घोटाळ्यांना तोंड देण्यासाठी भारतालाही तयार राहावे लागेल आणि इंटरनेट वापरकर्ता म्हणून तुम्हाला सतर्क राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.