सावधान, एका मिनिटाचा कॉल आणि पडला 2.8 कोटींचा फटका, WhatsApp वर केलेली ही चूक पडली महागात

या ६८ वर्षांच्या उद्योजकानं केलेल्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२२ पासून या प्रकरणाला सुरुवात झाली. ८ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास या उद्योजकाला एका मुलीचा मेसेज आला. त्यात तिनं ती मोरबीची रहिवासी असल्याचं लिहलं होतं. त्यांच्यातील या संवादाच्या काळातच त्या मुलीनं या व्यक्तीला व्हिडीओ कॉल केला आणि व्हर्च्युअल सेक्स करण्याची मागणी केली.

    अहमदाबाद : गुजरात (Gujarat) राज्यातील एका ६८ वर्षांच्या उद्योजकाला (Businessman) सेक्सटॉर्शनचा (Sextortion) फटका सहन करावा लागलाय. या प्रकारात ऑगस्ट २०२२ ते डिसेंबर २०२२ या काळात या उद्योजकाकडून २.८ कोटींची खंडणी (Extortion) वसूल करण्यात आलीय. सेक्सटॉर्शनच्या प्रकारात झपाट्यानं वाढ होताना दिसतेय. त्याचाच हा उद्योजक बळी ठरलाय.

    सेक्सटॉर्शन म्हणजे काय ?

    हे प्रकरण माहित होण्यापूर्वी Sextortion म्हणजे काय आहे, हेही माहित करुन घेणं तितकचं गरजेच आहे. गुन्ह्याच्या या नव्या पद्धतीनं अनेक जणांना अक्षरश: देशोधडीला लावल्याच्या घटना घडतायेत. अनेकदा व्हॉट्सअपवर काही सेकंदासाठी आलेल्या अनोळखी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून हे स्कॅमर्स लोकांच्या अश्लील क्लीप तयात करतात. त्यानंतर ब्लॅकमेल केलं जातं आणि त्यांच्याखडून खंडणी वसूल करण्यात येते.

    नेमकं या प्रकरणात काय घडलं ?

    या ६८ वर्षांच्या उद्योजकानं केलेल्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२२ पासून या प्रकरणाला सुरुवात झाली. ८ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास या उद्योजकाला एका मुलीचा मेसेज आला. त्यात तिनं ती मोरबीची रहिवासी असल्याचं लिहलं होतं. त्यांच्यातील या संवादाच्या काळातच त्या मुलीनं या व्यक्तीला व्हिडीओ कॉल केला आणि व्हर्च्युअल सेक्स करण्याची मागणी केली. सुरुवातीला या व्यक्तीनं आढेवेढे घेतले. मात्र मुलीनं यात काहीच चूक नसल्याचं त्याला सांगितलं. त्यानंतर या व्क्तीनं फोन सुरु ठेवला. या दोघांचं संभाषण केवळ एक मिनिटभर चाललं आणि मुलीनं कॉल डिस्कनेक्ट केला. त्यानंतर याच मुलीनं कॉल करुन या पीडित व्यक्तीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली.

    कसा सुरु होतो हा सगळा खेळ?

    या पीडित उद्योजकानं घाबरुन तातडीनं पेमेंट केलं. त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा खेळच सुरु झाला. त्यानंतर कुणी पोलिसाच्या वेशात, कुणी सायबर क्राईम सेलमधील अधिकारी असल्याचं सांगत या उद्योजकाकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केली. पोलीस आता तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करतायेत. सगळ्याच अशा प्रकरणांमध्ये साधारण हेच घडताना दिसतंय.

    तुम्ही काय काळजी घ्याल ?

    व्हाट्सअप असो वा दुसरा कोणताही सोशल मीडिया, अनोळखी कॉल्सपासून सावध राहा. अनेकदा हे स्कॅमर्स थेट व्हिडीओ कॉलच करतात. अशा कॉल्सना उत्तर देऊ नका. जर तुम्ही चुकून फोन उचललाच तरी या स्कॅमर्सना बळी पडू नका. जर तुम्हाला घडलेल्या प्रकाराबाबत चिंता वाटत असेल तर थेट पोलीस स्टेशन गाठा आणि घडलेल्या प्रकाराची रितसर तक्रार नोंदवा. कोणत्याही स्थितीत या खंडणीखोरांना पैसे देऊ नका.