shocking crime whale fish vomit worth rs 31 67 crore seized from tamil nadu tuticorin beach 4 smugglers also arrested nrvb

अधिकाऱ्यांनी सांगितले की, तामिळनाडूतील चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत डीआरआयने सुमारे 40.52 किलो व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे.

    नवी दिल्ली: डीआरआयने (DRI) व्हेल माशाची उलटी (Whale Fish Vomit) तस्करीच्या रॅकेटचा (Smuggling Racket) पर्दाफाश केला, जे देशाच्या वनस्पती आणि प्राण्यांसाठी धोकादायक आहे. तामिळनाडूमधील तुतीकोरीन समुद्रकिनाऱ्यावर (Tamil Nadu Tuticorin Beach) 18.1 किलो व्हेल उलटी जप्त करण्यात आली, ज्याचे बाजार मूल्य 31.67 कोटी रुपये आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तुतीकोरीनच्या किनार्‍याजवळ हार्बर बीचजवळ सागरी मार्गाने भारतातून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी 5 तस्करांना अटक केली आहे. वाहनातून 18.1 किलो व्हेल माशाच्या उलटी जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी तस्करीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे.

    व्हेल माशाची उलटी ही वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या अनुसूची अंतर्गत सूचीबद्ध केलेली संरक्षित प्रजाती आहे आणि त्यामुळे ताब्यात/निर्यात/वाहतूक प्रतिबंधित आहे. अशा तस्करीच्या प्रयत्नांपासून वनस्पती आणि जीवजंतूंचे संरक्षण करण्यासाठी DRI ने किनारी भागात आपली दक्षता आणि पाळत ठेवणे अधिक तीव्र केले आहे.

    अधिकाऱ्यांनी सांगितले की, तामिळनाडूतील चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत, डीआरआयने सुमारे 40.52 किलो व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 54 कोटी आहे.