shocking news mumbai solapur mumbai shirdi vande bharat express passengers distribute expired biscuits with tea by railway complaint online no response yet nrvb

एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रारही नोंदविली आहे. गेल्या १० फेब्रुवारी रोजी मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.

सोलापूर : मोठा गाजावाजा करून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिरवा कंदील दाखवून सुरू केलेल्या मुंबई-सोलापूर-मुंबई (Mumbai Solapur Mumbai) वंदे भारत एक्सप्रेसचे (Vande Bharat Express) सार्वत्रिक कौतुक होत असताना याच गाडीत प्रवाशांना चहासोबत दिली जाणारी बिस्किटे (Biscuits) चक्क कालबाह्य तारखेची (Expired) असल्याचा धक्कादायक (Shocking) प्रकार समोर आला आहे.

यासंदर्भात एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रारही नोंदविली आहे. गेल्या १० फेब्रुवारी रोजी मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. संपूर्ण वातानुकूलित, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त, आरामदायी आणि मध्यम जलदगती गाडी म्हणून वंदे भारत एक्सप्रेसचे सर्वत्र उत्सवी थाटात, मोदी-मोदीचा धोशा लावत, वाजत-गाजत स्वागत करण्यात आले होते.

प्रवाशांमध्येही याबद्दल समाधानाची भावना व्यक्त होत असताना या वंदे भारतला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान,सोलापूरहून मुंबईला निघालेल्या याच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट खानपान सेवेचा अनुभव प्रवाशांना आला. नागेश पवार हे सोलापूरहून मुंबईला याच गाडीतून प्रवास करीत होते. एकक तर सकाळी १५ मिनिटे उशिरा वंदे भारत एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक सोडले. पुढे काही वेळातच प्रवाशांना खानपान सेवेचा भाग म्हणून चहा-बिस्किटे देण्यात आली. परंतु चहासोबत दिलेली बिस्किटे उत्सुकतेपोटी न्याहाळली असता ही बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची आढळून आल्यामुळे प्रवाशांना धक्का बसला.

त्याचा अनुभव नागेश पवार या प्रवाशाला प्रत्ययास आला. तेव्हा त्यांनी तेवढ्याच सजगतेने रेल्वे प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार नोंदविली. यासंदर्भात पवार यांनी तक्रारीची चित्रफित तयार करून समाज माध्यमातून प्रसारित केली. यात चहासोबत त्यांना देण्यात आलेल्या बिस्किटाच्या पाकिटावर बिस्किटाची उत्पादन केल्याची तारीख २६ ऑगस्ट २०२२ आहे. कालबाह्य तारीख २५ फेब्रुवारी २०२३ अशी आहे.