धक्कादायक; नागालँडमधील कारागृहातून नऊ कैद्यांचे पलायन

नागालँडमधील मोन जिल्हा कारागृहातील किमान नऊ कैद्यांनी कारागृहातून पलायन केले आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू असल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. या कैद्यांमध्ये खटले सुरू असलेले कच्चे कैदी तसेच खुनाचा गुन्हा सिद्ध झालेले कैदीही आहेत.

    कोहिमा – नागालँडमधील (Nagaland) मोन जिल्हा कारागृहातील किमान नऊ कैद्यांनी (Prisoner) कारागृहातून (Jail) पलायन केले आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू असल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. या कैद्यांमध्ये खटले सुरू असलेले कच्चे कैदी तसेच खुनाचा गुन्हा (Murder Case) सिद्ध झालेले कैदीही आहेत.

    एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी पहाटे त्यांच्या कोठडीच्या चाव्या मिळाल्या. या चाव्या त्यांना कशा मिळाल्या, हे अद्याप समजू शकले नाही. त्यामुळे ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी सोम पोलीस ठाण्यात (Som Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.