सुरतमधील धक्कादायक प्रकार; कामावरून काढणाऱ्या मालकालाच परप्रांतीय कामगारांनी संपवलं

मालक कल्पेश ढोलकिया (३६) त्यांचे वडील धनजी ढोलकिया (६१) आणि मामा घनश्याम रजोडिया (५६) आपल्या कंपनीत आराम करत असताना आरोपी कर्मचाऱ्यांनी चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर झालेला आरडाओरडा ऐकून इतर कामगार घटनास्थळावर आले आणि त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने तिघांचाही उपचारादरम्यानच मृत्यू झाला.

    अहमदाबाद : कामावरून काढल्याच्या रागातून दोन कर्मचाऱ्यांनी मालकाची चाकू भोसकून हत्या (Murder) केली. हा प्रकार गुजरात राज्यातील सुरतमधील अमरोली (Surat-Amroli) येथे एका भरतकामातून वस्तूनिर्मिती (Manufacturing Company) करणाऱ्या कंपनीत घडला. घटनेनंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून परप्रांतीय (Migrant Workers) आहेत. तसेच, दोन आरोपींपैकी एक अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    मालक कल्पेश ढोलकिया (३६) त्यांचे वडील धनजी ढोलकिया (६१) आणि मामा घनश्याम रजोडिया (५६) आपल्या कंपनीत आराम करत असताना आरोपी कर्मचाऱ्यांनी चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर झालेला आरडाओरडा ऐकून इतर कामगार घटनास्थळावर आले आणि त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने तिघांचाही उपचारादरम्यानच मृत्यू झाला.

    अमरोली पोलिसांनी (Amroli Police) या प्रकरणी दोन्ही आरोपी कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. अशोक राऊत (२१) असे आरोपीचे नाव असून अन्य एक आरोपी अल्पवयीन आहे. दोन्ही आरोपी सुरत महानगरपालिका हद्दीत राहत असून मूळचे ओडिशातील कोसाड आणि गंजम जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

    काय घडला प्रकार?
    कंपनी मालक कल्पेश यांनी १० दिवसांपूर्वीच दोन्ही आरोपी कर्मचाऱ्यांना कामावर घेतले होते. रविवारी (२५ डिसेंबर) सकाळी कल्पेश वडिल आणि मामांसोबत कंपनीत आला. तेव्हा दोघे कामगार झोपलेले होते. यानंतर त्यांनी कामगारांना फटकारले आणि कामावरून काढून टाकले. यानंतर काही वेळातच दोघे कामगार परत आले आणि त्यांनी मालक कल्पेशसह वडिल आणि मामांवर हल्ला केला.