पोलिसांचा दावा : श्रद्धा तिच्या मैत्रिणीला भेटून आली, यावर आफताबला संताप अनावर, आला राग आणि रागाच्या भरातच…

अनेक दिवस पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिसांनी केलेल्या तपासात १८ मे रोजी श्रद्धाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आफताबने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहासह निर्दयतेची परिसीमा ओलांडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत लिव्ह-इन पार्टनरची (Live In Partner) हत्या (Murder) करून त्याचे ३५ तुकडे (35 Pieces) केल्याप्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे (A New Update). मंगळवारी पोलिसांनी त्यांच्या तपासाच्या आधारे दावा केला की, घटनेच्या दिवशी श्रद्धा (Shraddha Walker) तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती (Meet Her Friend). यामुळे आफताब संतापला (Aftab Was Angry). श्रद्धा घरी परतल्यावर संतापलेल्या आफताबने श्रद्धाची हत्या केली. पोलिसांनी मंगळवारी आरोपी आफताबविरुद्ध ६६२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

    आफताबने मृतदेहासोबत केले होते गैरवर्तन

    अनेक दिवस पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिसांनी केलेल्या तपासात १८ मे रोजी श्रद्धाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आफताबने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहासह निर्दयतेची परिसीमा ओलांडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय श्रद्धाची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे जवळपास ३५ तुकडे करण्यात आल्याचा आरोप आहे. आफताबने श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर आफताबने अनेक महिने श्राद्धाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

    जंगलात सापडलेल्या हाडांची झाली होती DNA तपासणी

    श्रद्धा हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी मेहरौलीच्या जंगलात काही हाडे गोळा केली होती. ही हाडे श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळली. या तपासणीनंतर हे स्पष्ट झाले की, ती हाडे श्रद्धा वालकरचीच होती. या तपासणीत पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यास मदत झाली. साकेत कोर्टाने देखील आफताबच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.