बापरे! मूल होण्यासाठी अजब प्रकार; पत्नीला पाजली स्मशानातील राख, हाडांचा देखील वापर; कुठे घडलेय घटना माहितेय…

मांत्रिक महिलेने तिला पूजेला बसविले. मृताची हाडे, केस, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके, असे सर्व त्या ठिकाणी होते. तेथे हाडांची पावडर करून तिला खाण्यासाठी दिली. तिने नकार दिला असता पिस्तुलाचा धाक दाखविण्यात आला. या सर्व प्रकारांना कंटाळूवन तिने अखेर याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

    पुणे : पती पत्नीच्या संसारात मूलं होत नाहीत, म्हणून वेगवेगळे उपचार केले जातात, तसेच पूजापाठ उपासतपास केले जातात, हे आपण ऐकले किंवा पाहिले असेल मात्र पुण्यात मुलं होण्यासाठी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळं एकच खळबळ माजली असून, या कृत्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मूलबाळ होत नसल्याने आणि आर्थिक सुबत्ता येण्यासाठी संगणक अभियंता असलेल्या पत्नीला स्मशानातील राख पाण्यातून पिण्यासाठी देण्याबरोबरच, पिस्तुलाच्या धाकाने मृतांच्या हाडाची पावडर खाण्यास भाग पाडून अघोरी पूजा करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील धायरी भागात उघडकीस आला आहे. यामुळं सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.

    दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि जयेशचा  विवाह थाटामाटात झाला, मात्र त्यानंतर विवाहितेचा छळ सुरू झाला. मूल होत नसल्यानं विवाहिते त्रास व छळ करण्यात आला. अमावस्येला घरातील मंडळी एकत्र येऊन आणि काळे वस्त्र घालून तळघरात रहस्यमय खोलीत अघोरी पूजा करत. मूल होत नसल्यानं एका अमावस्येला पतीसह सर्व मंडळींनी तिला घराजवळील स्मशानभूमीत नेले. जळालेल्या प्रेताची हाडे त्यांनी जमा केली. राखही बरोबर घेतली. या वस्तू घरी आणून त्यांनी पूजा केली आणि ती राख पाण्यात टाकून बळजबरीने तिला पिण्यासाठी दिली.

    विवाहितेच्या जावेच्या आई-वडिलांकडे निगडी येथे अशीच पूजा असल्याचे सांगून तिला एकदा तेथे नेण्यात आले. त्या घरीही अघोरी पूजा मांडण्यात आली होती. तेथे मांत्रिक महिलेने तिला पूजेला बसविले. मृताची हाडे, केस, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके, असे सर्व त्या ठिकाणी होते. तेथे हाडांची पावडर करून तिला खाण्यासाठी दिली. तिने नकार दिला असता पिस्तुलाचा धाक दाखविण्यात आला. या सर्व प्रकारांना कंटाळूवन तिने अखेर याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.

    दरम्यान, या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पती जयेश कृष्णा पोकळे, तसेच श्रेयश कृष्णा पोकळे, ईशा श्रेयश पोकळे, प्रभावती कृष्णा पोकळे, कृष्णा विष्णू पोकळे (रा. राधाकृष्ण व्हीला, पोकळे पॅराडाईज, धायरी) दीपक जाधव आणि बबीता उर्फ स्नेहा जाधव (रा. निगडी प्राधिकरण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.