crime scene

किरोकळ वादातून संतापलेल्या एका विद्यार्थ्यानं आपल्यात वर्गमित्रावर कोयत्यानं सपासप वार केले आणि तिथून फरार झाला.

    सांगली : आजकाल क्षुल्लक कारणावरुन भांडण होऊन प्रकरण हाणामारी पर्यंत जाण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. कधी प्रेमसंबधातुन तर कधी मित्रांमध्येच भांडण होऊन एकमेंकावर जीवघेणा हल्ला होताना दिसतो. सांगलीत असचं एक प्रकरण समोर आलं आहे. दोन वर्गमित्रामध्ये क्षुल्लाक कारणावरुन भांडण झालं. मात्र ते भांडण विकोपाला गेलं आणि एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला (students attack his classmate) करत त्याला जखमी केलं. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    नेमकं घडलं काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीमधील हरभट रस्त्यावरील आरवाडे हायस्कूलमध्ये ही घटना घडली आहे.  येथील नववीमध्ये शिकणारे दोन मुलांमध्ये काही दिवसापुर्वी वाद झाला होता. दोघांकडूनही एकमेंकाना चिडवाचिडवी सुरु होती.  घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाला यावेळी संतापलेल्या  एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केलं. सलमान असं जखमी झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.

    कोयत्यानं मानेवर केले वार

    दोघांमध्येही वाद झाल्यानंतर संतापलेल्या संशयित विद्यार्थ्याने बाकावर बसलेल्या सलमानवर कोयत्यानं सपासप वार केले, मानेवरही त्यानं थेट वार केला. यावेळी वार अडवताना सलमानच्या हातावरही जखम झाली. भर शाळेत हल्ला झाल्यानंतर मुलांमध्ये घबराट निर्माण झाली. मुलांचा आरडाओरड सुरू झाला. जखमी सलमानला शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांनी उचलून सिव्हिलमध्ये उपचारास नेले. तिथून विश्रामबागच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. मानेवरील जखमेवर 35 टाके घालण्यात आले. उपचारानंतर सलमानची प्रकृती थोडीसी स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. सलमानवर हल्ला केल्यानंतर संशयित हल्लेखोर मुलगा पसार झाला आहे.