Suicide of a married woman within ten days

विवाह होवून अवघे दहाच दिवस झाले होते. हातावरची मेहंदी देखील पुसली नव्‍हती. यापुर्वीच विवाहीत तरुणीने गळफास घेत आत्‍महत्‍या केली. सासरच्या मंडळीकडून आर्थिक व मानसिक छळ होत असल्याने तरुणीची गळफास घेतला. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मौजा गावात ही अत्यंत धक्कादायक घटना घडली(Suicide of a married woman within ten days).

    हिंगोली : विवाह होवून अवघे दहाच दिवस झाले होते. हातावरची मेहंदी देखील पुसली नव्‍हती. यापुर्वीच विवाहीत तरुणीने गळफास घेत आत्‍महत्‍या केली. सासरच्या मंडळीकडून आर्थिक व मानसिक छळ होत असल्याने तरुणीची गळफास घेतला. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मौजा गावात ही अत्यंत धक्कादायक घटना घडली(Suicide of a married woman within ten days).

    हिंगोलीत कौटुंबिक हिंसाचाराने विवाह सोहळ्याच्या दहाव्या दिवशी १९ वर्षीय नवविवाहितेचा बळी घेतला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मौजा गावात ही अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, सासरच्या मंडळीकडून आर्थिक व मानसिक छळ होत असल्याने या नवविवाहित तरुणीने संसाराची गोड स्वप्ने रंगवण्याआधीच गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.

    घटनेप्रकरणी विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बासंबा पोलीस स्थानकात विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सासू, सासरे व पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती बासंबा पोलिसांनी दिली आहे.