
देशात दहशवादी कारावायात अन्सारी सामील असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या प्रकरणात पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. 2015 सालापासून अन्सारी पुण्याच्या भवानी पेठेत राहात असल्याची माहितीही समोर आली आहे.
पुणे– बेकायदेशीररित्या पुण्यात (Pune) राहणाऱ्या एका पाकिस्तानी ( terrorist) नागरिकाला पुणे पोलिसांनी (Police) अटक केली आहे. 22 वर्षांचा मोहम्मद अमन अन्सारी हा गेल्या 8 वर्षांपासून पुण्यात राहात होता. पोलिसांच्या स्पेशल टीमनं खडक परिसरातून त्याला अटक केली आहे. अन्सारी याच्याकडे खोटा पाकिस्तानी पासपोर्ट आणि भारतीय पासपोर्टही सापडला आहे. परदेशात जाण्यासाठी या पासपोर्टचा वापर होत असल्याचं सांगण्यात येतय. अन्सारी याच्या अटकेनंतर तपाय यंत्रणा अलर्ट झाल्या आहे. देशात दहशवादी कारावायात अन्सारी सामील असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या प्रकरणात पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. 2015 सालापासून अन्सारी पुण्याच्या भवानी पेठेत राहात असल्याची माहितीही समोर आली आहे.
अन्सारीला कशी करण्यात आली अटक
पुण्यातील भवानी पेठेतील एका तालमीजवळ पाकिस्तानी घुसखोर राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि अन्सारीला अटक केली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडे बनावट पासपोर्ट असल्याचं पोलिसांना कळालं. या खोट्या पासपोर्टवर त्यानं दुबईपर्यंत प्रवास केल्याचंही समोर आलं आहे. अन्सारी परदेशात जाऊन आल्यानं तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दहशतवादी कारवायांत अन्सारी याचा समावेश होता का, याची तपासणी आता करण्यात येतेय.