mumbai Actress accused of raping director

साक्री तालुक्यातील मसदी येथील गंगामाई कन्या विद्यालय येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाराधम शिक्षक असलेल्या कौतिक साहेबराव चव्हाण यांनी एक विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याच शिक्षकाने काही पैसे देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती त्याच शाळेतील कनिष्ठ लिपिक असलेले विजय अहिरे यांनी दिली(Teacher's obscene act with student captured on CCTV camera! Attempt to suppress the case by paying Rs 3 lakh; Shocking type of Dhule girls school). 

    धुळे : साक्री तालुक्यातील मसदी येथील गंगामाई कन्या विद्यालय येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाराधम शिक्षक असलेल्या कौतिक साहेबराव चव्हाण यांनी एक विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याच शिक्षकाने काही पैसे देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती त्याच शाळेतील कनिष्ठ लिपिक असलेले विजय अहिरे यांनी दिली(Teacher’s obscene act with student captured on CCTV camera! Attempt to suppress the case by paying Rs 3 lakh; Shocking type of Dhule girls school).

    गंगामाई कन्या विद्यालय या संस्थेत डिसेंबर 2020 मध्ये वाद झाले होते त्यानंतर मुख्याध्यापिका वर्षा नरेंद्र देवरे यांनी मला या वादाचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सांगितले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना शिक्षक कौतिक साहेबराव चव्हाण हा दहावीच्या विद्यार्थ्यांनी सोबत अश्लील चाळे करताना दिसून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

    यानंतर तो व्हिडिओ पेन ड्राइव्ह मध्ये काढून उपशिक्षक असलेले नरेंद्र आत्माराम देवरे यांच्याकडे दिले, परंतु त्यांनी त्या शिक्षक असलेल्या कौतिक साहेबराव चव्हाण यांच्यावर कारवाई न करता उलट माझ्यावरच कारवाईची धमकी दिली. तू हे प्रकरण बाहेर आणू नको अन्यथा तुला नोकरीवरून काढून टाकू अशी धमकी दिली त्यानंतर मुख्याध्यापिका वर्षा देवरे व उपशिक्षक असलेले नरेंद्र देवरे यांनी त्या शिक्षकाकडून तीन लाख रुपये घेऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. अशी धक्कादायक माहिती कनिष्ठ लिपिक असलेले विजय अहिरे यांनी आज धुळ्यात पत्रकार परिषद मध्ये बोलतांना सांगितले.

    यानंतर मी नाशिक व धुळे येथील शिक्षण अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रार केली, परंतु त्यांनी कुठलीही दखल व कारवाई न केल्याने उलट त्यांनाच पाठीशी घातले. यानंतर मात्र मी पुढाकार घेऊन त्या तिघान विरोधात साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मुख्याध्यापिका वर्षा नरेंद्र देवरे, उपशिक्षक नरेंद्र आत्माराम देवरे व उपशिक्षक असलेला नराधम कौतिक साहेबराव चव्हाण यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु हे तिघेही आरोपी यानंतर फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

    या प्रकरणात संशयित असलेल्या तीनही आरोपींना अटक करून या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार देऊन त्यांची इं कॅमेरा चौकशी करा तसेच तिघांवर कठोर कारवाई करा आणि मला न्याय द्यावा अशी मागणी कनिष्ठ लिपिक विजय आरे यांनी पत्रकार परिषदेत केली.