भारतीय क्रिकेटपटू Umesh Yadav ची त्याच्याच माजी व्यवस्थापकाने केली फसवणूक, त्याच्याच पैशांवर मारला डल्ला, खात्यातून उडवले लाखो रुपये ; वाचा काय आहे प्रकरण?

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला त्याच्याच माजी व्यवस्थापकाने दगा दिला आहे. पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, माजी व्यवस्थापकाने उमेश यादवच्या खात्यातून ४४ लाख रुपयांचा गंडा घातला.

    नागपूर : टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज (Fast Bowler) उमेश यादव (Umesh Yadav) फसवणुकीचा बळी (A Victim Of Fraud) ठरला आहे. नागपुरातील कोराडी (Koradi, Nagpur) येथील उमेश यादव याने आपल्या माजी व्यवस्थापकाविरुद्ध (Ex Manager) सुमारे ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार (Complaint Of Fraud Of Rs. 44 lakhs) दाखल केली आहे. उमेश यादवच्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे (The police have started an investigation into the matter).

    मिळालेल्या माहितीनुसार, उमेश यादव यांनी त्यांचे माजी व्यवस्थापक शैलेश ठाकरे (Former Manager Shailesh Thackeray) यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. उमेश यादवचे उत्पन्न, बँक तपशील आणि इतर सर्व बाबींची जबाबदारी शैलेश यांच्याकडे होती. मात्र, त्यांच्याकडून पैसे घेऊन कोणतेही काम केले नसल्याचा आरोप उमेश यादव यांनी केला आहे.

    ज्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे, तो मालमत्तेशी संबंधित आहे. उमेश यादव यांनी मालमत्ता खरेदी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात ४४ लाख रुपये जमा केले. मात्र शैलेश ठाकरे यांनी हे पैसे काढून स्वत:च्या नावावर मालमत्ता खरेदी केली. उमेश यादव यांना हे पैसे परत मिळाले नाहीत.

    भारतीय क्रिकेटपटूने त्याचे पैसे परत मागितल्यावर शैलेश ठाकरे फरार झाला. त्यानंतर त्यांनी आता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नागपूर शहरातील कोराडी येथे पोलिसांनी भादंवि कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

    उमेश यादवबद्दल बोलायचे झाले तर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळाले आहे. अशा परिस्थितीत तो टीम इंडियाच्या वेगवान बॅटरी युनिटमध्ये सामील होईल. उमेश यादवने भारताकडून आतापर्यंत ५४ सामन्यांत १६५ बळी घेतले आहेत, तर ७५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०६ बळी घेतले आहेत.