भाजपाच्या माजी आमदारासह पत्नीविरोधात ठाणे अँटी करप्शन ब्युरोकडून गुन्हा दाखल;उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या पत्नीविरोधात ठाणे अँटी करप्शन ब्युरोने गुन्हा दाखल केला आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप यांच्यावर आहे(Thane Anti-Corruption Bureau files case against former BJP MLA and his wife).

    ठाणे : भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या पत्नीविरोधात ठाणे अँटी करप्शन ब्युरोने गुन्हा दाखल केला आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप यांच्यावर आहे(Thane Anti-Corruption Bureau files case against former BJP MLA and his wife).

    नरेंद्र मेहतांविरोधात एसीबीला तक्रार मिळाली होती. त्या तक्रारीचा तपास एसीबीकडून सुरू होता. 1 जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2015 दरम्यान मेहता यांनी उत्पन्नापेक्षा 8.25 कोटी रुपयांची अधिक संपत्ती गोळा केल्याचे तपासातून समोर आले आहे.

    यामध्ये पत्नी सुमन मेहतांनी त्यांना मदत केली असून ठाणे एसीबीने दोघांविरोधात गुरुवारी भाईंदरच्या नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मेहता या कालावधीत मीरा-भाईंदर महानरपालिकेत नगरसेवक, महापौर आणि आमदार राहिले.

    नरेंद्र मेहतांनी बेकायदेशीर मार्गाने संपत्ती जमा केल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानंतर मेहता यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर मेहता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.