ऑटोतून विद्यार्थ्यीनीचा मोबाईल लुटणारा आरोपी पोलीस चकमकीत ठार, ऑटोतून खाली पडल्यानं मुलीचा झालाय मृत्यू!

गाझियाबादमध्ये मोबाईल फोन लुटण्यासाठी बीटेकच्या विद्यार्थ्याला ऑटोमध्ये खेचणारा दुसरा आरोपी जीतू याला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. 27 ऑक्टोबर रोजी दरोड्याच्या प्रयत्नात या विद्यार्थ्यानीची हत्या झाली होती.

    दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद मध्ये बी.टेक विद्यार्थिनी कीर्ती सिंगचा मोबाईल लुटणारा दुसऱ्या आरोपीला यूपी पोलिसांनी चकमकीत (UP Encounter) ठार केलं आहे. रात्री उशिरा झालेल्या चकमकीत जितेंद्र उर्फ ​​जीतूचा मृत्यू झाला. जितेंद्रवर 12 गुन्हे दाखल असून त्यापैकी अर्धा डझन दरोड्याचे आहेत. त्याच्यावर 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. यापूर्वी शनिवारी सायंकाळी एका आरोपीला पोलीस चकमकीत अटक करण्यात आली होती.

    मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगानाहर ट्रॅकवर झालेल्या चकमकीत तो जखमी झाला होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत एक पोलीसही जखमी झाला आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    27 ऑक्टोबर रोजी बीटेकची विद्यार्थिनी कीर्ती सिंह NH-9 वर असलेल्या ABES इंजिनिअरिंग कॉलेजमधून ऑटोने आपल्या घरी जात होती. मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उद्योग कुंजसमोर आल्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी बाजूला बसलेल्या कीर्तीचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. कीर्तीने विरोध करत आपला मोबाईल चोरीला जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी तिला खेचले. ऑटोमधून पडल्याने कीर्ती जखमी झाली. त्यांच्या डोक्यातील हाड तुटले. तिचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    पोलिसांवरही कारवाई

    ही घटना उघडकीस आल्यानंतर मसुरीचे एसएचओ रवींद्र चंद पंत यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. शिवाय, अतिरिक्त निरीक्षक पुनीत सिंग आणि तनवीर आलम यांना लाइनवर ठेवण्यात आले. त्याचबरोबर सिहानी गेटचे एसएचओ नरेश कुमार शर्मा यांना मसुरी पोलिस स्टेशनचे एसएचओ बनवण्यात आले आहे, तर नगर कोतवाली येथे तैनात इन्स्पेक्टर विनेश कुमार सिंह यांना सिहानी गेटच्या एसएचओची जबाबदारी देण्यात आली आहे.