नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या आरोपीची आत्महत्या

मावळ तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या गुन्ह्यातील आरोपीने आत्महत्या केली आहे. विजय शशिकांत मालकोटे वय ३५ रा. उर्से मावळ) असे गळफास घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.शुक्रवार दि २९ दुपारी २:३० वाजण्याच्या शिरगाव येथे घटना उघडकीस आली.

    वडगाव मावळ : मावळ तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या गुन्ह्यातील आरोपीने आत्महत्या केली आहे. विजय शशिकांत मालकोटे वय ३५ रा. उर्से मावळ) असे गळफास घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.शुक्रवार दि २९ दुपारी २:३० वाजण्याच्या शिरगाव येथे घटना उघडकीस आली.

    आरोपीने चाॅकलेटचे आमिष दाखवून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी (दि.२५ ) सायंकाळी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या दिवसापासून आरोपी फरार होता‌. आरोपीने काल गळफास घेऊन आत्महत्या केली शुक्रवार दि २९ दुपारी २:३० वा मुतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बळवंत गवित, प्रकाश पारखे, पोलीस अंमलदार समाधान फडतरे यांनी घटनास्थळी धाव घेत मुतदेहाचा पंचनामा केला. याबाबत पुढील तपास शिरगाव पोलिस करीत आहेत.