नायगाव स्थानकाजवळ सुटकेसमध्ये आढळला शाळकरी मुलीचा मृतदेह

शुक्रवारी दुपारी ३ वाजता नायगाव रेल्वे पोलिसांना फोन आला की, नव्याने बांधलेल्या पूर्व-पश्चिम पुलाजवळील झुडपात एका मुलीचा मृतदेह पडलेला आहे. त्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यावर एका बॅगमध्ये मुलीचा मृतदेह आढळला. संबंधित मुलीच्या पोटावर वार झाल्याचे दिसत असल्याने तिची हत्या झाली असावी असा अंदाज आहे.

    मुंबई : नायगाव रेल्वे स्थानकाजवळ (Naigaon Railway Station) शुक्रवारी बंद सुटकेसमध्ये १५ वर्षीय शाळकरी मुलीचा (Schoolgirl) मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा (Murder) गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे. हत्या झालेली मुलगी गुरुवारी दुपारपासून अंधेरी येथील घरातून बेपत्ता (Missing) होती. त्यानंतर तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

    वालीव पोलीस (Waliv Police) ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी ३ वाजता नायगाव रेल्वे पोलिसांना फोन आला की, नव्याने बांधलेल्या पूर्व-पश्चिम पुलाजवळील झुडपात एका मुलीचा मृतदेह पडलेला आहे. त्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यावर एका बॅगमध्ये मुलीचा मृतदेह आढळला. संबंधित मुलीच्या पोटावर वार झाल्याचे दिसत असल्याने तिची हत्या झाली असावी असा अंदाज आहे.

    अंधेरी पोलिसांनी (Andheri Police) सांगितले की, संबंधित मुलगी गुरुवारी सकाळी शाळेत जाते म्हणून अंधेरीतील घरातून निघाली. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. अंधेरी पोलिसांनी बेपत्ता मुलगी अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.