माजी नगरसेवकाच्या ‘त्या’ मुलावर ही गुन्हा दाखल

चिंचवड येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात एका माजी नगरसेवकाच्या मुलावर वार करण्यात आले. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून त्या माजी नगरसेवकाच्या मुलाने एकावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी: चिंचवड येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात एका माजी नगरसेवकाच्या मुलावर वार करण्यात आले. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून त्या माजी नगरसेवकाच्या मुलाने एकावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    प्रशांत नागेश आगज्ञान (वय४५, रा. भोई आळी, चिंचवड), अक्षय सूर्यवंशी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रशांत हा माजी नगरसेवक नागेश आगज्ञान यांचा मुलगा आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक हरिभाऊ तिकोने यांचा मुलगा सूरज तिकोने (वय २७, रा. दत्तनगर, थेरगाव) याने सोमवारी (दि. ९) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (दि. ८) रात्री साडेआठच्या सुमारास भोई आळी, चिंचवडगाव येथे घडली.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी आणि फिर्यादी यांचे मित्र ऋषिकेश सावंत यांच्यात शनिवारी (दि. ७) भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करीत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. दरम्यान, प्रशांत आगज्ञान यांनी देखील चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सूरज तिकोने यांच्यासह त्यांचे पाच ते सहा साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.