The deadbody was found in Vashi creek

मुंबईला लागून असलेल्या वाशीच्या खाडीत रविवारी सकाळी भांडुप येथील रहिवासी असलेल्या ५४ वर्षीय व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला. प्रशांत तुकाराम विचारे असे मयताचे नाव आहे. काही पादचाऱ्यांनी त्यांचा मृतदेह पाहिला आणि नियंत्रण कक्षाच्या मदतीने पोलिसांना याची माहिती दिली( The deadbody was found in Vashi creek).

    मुंबई : मुंबईला लागून असलेल्या वाशीच्या खाडीत रविवारी सकाळी भांडुप येथील रहिवासी असलेल्या ५४ वर्षीय व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला. प्रशांत तुकाराम विचारे असे मयताचे नाव आहे. काही पादचाऱ्यांनी त्यांचा मृतदेह पाहिला आणि नियंत्रण कक्षाच्या मदतीने पोलिसांना याची माहिती दिली( The deadbody was found in Vashi creek).

    माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले व सर्व औपचारिकता पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नवी मुंबई येथील शासकीय रुग्णालयात पाठविला.

    वाशी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केल्याची चर्चा आहे. वाशीच्या खाडीत उडी मारून असंख्य लोकांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. खाडीवरील पुलाकडे जाताना पोलीस सीसीटीव्हीची पडताळणी करत आहेत. दोन्ही बाजूला कॅमेरे बसवले आहेत आणि मृताच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचीही वाट पाहत आहे.