
दिल्ली पोलिसांना मिळालेल्या या अहवालात जंगलात सापडलेली हाडं, केस आणि रक्त यांचा डीएनए तिच्या वडिलांसोबत जुळला आहे.
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर (Shraddha walkar Murder Case) हत्या प्रकरणी रोज नवे नवे खुलासे होत आहेत.श्रद्धाचा मारेकरी आरोपी आफताब अमीन पूनावाला काल १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. पोलिसांना जंगलातून सापडलेल्या अवशेषांचा डीएनए चाचणी करण्यात आली होती.आज त्याचा अहवाल समोर आला असून तिचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळला आहे.
दिल्ली पोलिसांना मिळालेल्या या अहवालात जंगलात सापडलेली हाडं, केस आणि रक्त यांचा डीएनए तिच्या वडिलांसोबत जुळला आहे. ती राहत असलेल्या फ्लॅटमध्ये फरशीवर रक्ताचे डाग आढळून आले होते. त्याचाही डीएनएही श्रद्धाच्या वडिलांशी जुळला आहे.
आफताबची होणार नार्को टेस्ट
नुकतीच आफताबची पॉलीग्राफ चाचणी घेण्यात आली. यावेळी पोलिसांना त्याला 40 प्रश्न विचारवले. श्रद्धाशी ओळख झाल्यापासून रिलेशनशिपमध्ये येईपर्यंत आणि त्यानंतरच्या दिवसांपर्यंतचे सर्व संबंधित प्रश्न त्याला विचारण्यात आले. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारं आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यालाठी केलेल्या कृत्यासंबंधीच्या प्रश्नांचा भडीमार त्याच्यावर करण्यात आला. डेटिंगच्या दिवसापासून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या दिवसापर्यंत सर्व माहिती आफताबकडून काढण्यासाठी यावेळी यंत्रणेनं सापळा रचला होता. दरम्यान सध्या या पॉलीग्राफ चाचणीचे विश्लेषण केले जात आहे. पॉलीग्राफ चाचणी ठीक असल्यास पुढील नार्को चाचणी केली जाईल.
हत्येची दिली कबुली
श्रद्धाचा मारेकरी आरोपी आफताबने (Aftab Poonawala) तिची हत्या केल्याची कबुली कोर्टाला दिली. त्याने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं कोर्टाला सांगितलं. तर दुसरीक़डे पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांकडे आफताबविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती आता समोर आली आहे.