
देहूरोड येथे दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी चार जणांना अटक केली असून एकाचा शोध घेण्यात येत आहे.
पिंपरी : देहूरोड येथे दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी चार जणांना अटक केली असून एकाचा शोध घेण्यात येत आहे. रामकृष्ण जाधव, बाळू जाधव, रामेश्वर जाधव आणि माणिक जाधव (सर्व रा. बीड) या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत सुशांत सूर्यवंशी (वय 31 वर्षे, रा. देहूगाव) यांनी 21 जून रोजी देहू रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी 21 जून रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास शनी मंदिराच्या बाजूस असणाऱ्या मोकळ्या मैदानात, चिंचोली येथे मोबाईलवर बोलत होते. दरम्यान, आरोपी तिथे आले आणि फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन 60,000 रुपये किंमतीची गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेले. याप्रकरणी सर्व आरोपिंच्या विरोधात भा. द. वि. कलम 395 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे, तर एकाच्या शोधात आहेत.