दोन लेकरांची आई 19 वर्षाच्या पोराच्या प्रेमात पडली आणि… बाईचं उत्तर ऐकून पोलिसांनी लावला डोक्याला हात

महिलांचे विवाहबाह्य प्रेमसंबधाच्या अनेक घटना घडत आहेत. अशीच एक विचित्र घटना बिहारमध्ये घडली आहे. दोन लेकरांची आई 19 वर्षाच्या पोराच्या प्रेमात पडली. हे प्रकरण पोलिसात गेले असता या महिलेने नव्या प्रियकरासोबत लग्न केल्याचे पोलिसांना सांगीतले(The mother of two children fell in love with a 19-year-old boy).

    या महिलेने तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान असणाऱ्या तिच्या प्रियकरासह राहण्याचा निर्णय घेतला आहे. ही महिला प्रियकरासह जेहनाबाद येथील घरातून पळून गेली. याबाबत महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

    जेहानाबादमधून पळून गेल्यावर दोघेही गोवा आणि मुंबईत राहिले पण पोलिसांचे धाबे दणाणल्यानंतर ते पुन्हा जेहानाबादला आले. या नंतर पोलिसांनी यांना ताब्यात घेतले असता महिलेने सासरी जाण्यास नकार दिला. मी माझ्या प्रियकरासोबत लग्न केले असून मला त्याच्यासहच रहायचे असल्याचे महिलेने पोलिसांना सांगीतले.

    या महिलेचा 10 वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर ही पतीसह आनंदात राहत होती. तिला दोन मुलेही आहेत. मात्र, दोन वर्षांपूर्वी ही महिला राँग नंबरवरून संपर्क झालेल्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्यांचे फोनवर बोलने सुरु झाले. भेटीगाठीनंतर दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. दोघांच्या वयात बराच फरक आहे. महिला ३० वर्षांची आहे तर तिचा प्रियकर अवघा १९ वर्षांचा आहे. वयात एवढे अंतर असूनही दोघेही भेटत राहिले.

    मात्र, महिलेच्या सासरच्या मंडळींना याची माहिती नव्हती. अखेर महिला प्रियकरासह पळून गेली. यानंतर महिनाभर दोघेही गोव्यात राहिले. यानंतर ते मुंबईत आले. मात्र, पोलिसांकडून शोध आणखी वाढल्याने ते पुन्हा जेहनाबादला गेले.