The mother sold her child and bought a TV freezer cooler

एका निर्दयी आईने संशय आणि पैशाच्या लोभापायी 15 दिवसांच्या तिच्या निरागस बाळाचा सौदा केला. मुलाला विकून या महिलेने टीव्ही, फ्रीझ, कूलर खरेदी केला (The mother sold her child and bought a TV, freezer, cooler).

    एका निर्दयी आईने संशय आणि पैशाच्या लोभापायी 15 दिवसांच्या तिच्या निरागस बाळाचा सौदा केला. मुलाला विकून या महिलेने टीव्ही, फ्रीझ, कूलर खरेदी केला (The mother sold her child and bought a TV, freezer, cooler).

    मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील हिरा नगर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. येथे गौरी नगर परिसरात भाड्याने राहणारे अंतरसिंग उर्फ ​​विशाल आणि शायना बी यांनी दुसरे लग्न केले होते. अंतर सिंग हा मजूर असून पत्नी शायना गृहिणी आहे. ही महिला गरोदर राहिल्यानंतर हे मूल तिचे नसून पहिल्या पतीचे असल्याचा तिला संशय आला. यानंतर गर्भातील बाळाची विक्री करण्याचा निर्णय तिने घेतला.

    एजंटच्या मदतीने महिलेने मुलाचा व्यवहार केला. रुग्णालयात प्रसूतीनंतर केवळ 15 दिवसांनी करारानुसार महिलेने दलालांमार्फत तिच्या नवजात बाळाची विक्री केली.

    साडे पाच लाखात हा सौदा करण्यात आला. एजंटने कमिशन कापून केवळ 2 लाख 70 हजार रुपये या महिलेला दिले. यानंतर मुलाला वाचवणाऱ्या दाम्पत्याने त्या पैशातून टीव्ही, फ्रीज, कुलर, वॉशिंग मशीन, मोटारसायकल यासह इतर वस्तू खरेदी केल्या.

    एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि सक्रियता दाखवत मुलाला सुखरूप बाहेर काढले. या प्रकरणी मुलाच्या पालकांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.