ड्रग्जच्या आहारी गेलेल्या पत्नीची हत्या; मृतदेहाचे केले तुकडे

ड्रग्जच्या आहारी गेलेली आपली पत्नी दुसऱ्या व्यक्तीकडे अनेक दिवसांपासून राहत होती. त्यामुळे नात्यात कटूता निर्माण झाली होती, अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिले. पत्नी फसवणूक करत असल्याचा संशय आल्यानंतर आरोपी पतीने हत्येची योजना आखली. या दाम्पत्याच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत.

    लखनौ – उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सीतापूरमध्ये पंकज मौर्या नावाच्या व्यक्तीने पत्नीची हत्या (Wife Murder) करून मृतदेहाचे तुकडे (Body Parts) केल्याची कबुली पोलिसांना दिली. एका साथीदाराच्या मदतीने आरोपीने पत्नीला निर्घृणपणे संपवले. सीतापूर पोलिसांना (Sitapur Police) ८ नोव्हेंबरला गुलारिहा भागातून पीडित ज्योतीच्या मृतदेहाचे अवयव आढळून आल्यानंतर या गुन्ह्याचा खुलासा झाला आहे.

    पोलिसांनी आरोपी पती पंकज मौर्यासह त्याचा साथीदार (Partner Arrest) दुर्जन पारसी याला अटक केली आहे. ड्रग्जच्या आहारी गेलेली आपली पत्नी दुसऱ्या व्यक्तीकडे अनेक दिवसांपासून राहत होती. त्यामुळे नात्यात कटूता निर्माण झाली होती, अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिले. पत्नी फसवणूक करत असल्याचा संशय आल्यानंतर आरोपी पतीने हत्येची योजना आखली. या दाम्पत्याच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत.