मोबाईलवरील ड्रिम इलेव्हन गेमच्या आर्थिक व्यवहारातून एकाचा खून ; एकजण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात  

मोबाईलवरील ड्रिम इलेव्हन ऑनलाईन गेमचे खेळलेले पैसे मागूनही देत नसल्याच्या कारणावरून सचिन सिध्देश्‍वर वरकुटे (वय 22,रा.भिकार अकोला) याचा धारदार हत्याराने डोकीत व गळयावर मारून खून केल्याप्रकरणी विजय नामदेव वरकुटे याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून पालिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

    मंगळवेढा : मोबाईलवरील ड्रिम इलेव्हन ऑनलाईन गेमचे खेळलेले पैसे मागूनही देत नसल्याच्या कारणावरून सचिन सिध्देश्‍वर वरकुटे (वय 22,रा.भिकार अकोला) याचा धारदार हत्याराने डोकीत व गळयावर मारून खून केल्याप्रकरणी विजय नामदेव वरकुटे याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून पालिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
    पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील मयत सचिन वरकुटे हा दि.22 रोजी 10.00 वा.भिकार अकोले येथील शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेला होता. यावेळी फिर्यादी सिध्देश्‍वर वरकुटे याचा पुतण्या कैलास याने येवून सांगितले की,विहिरीजवळ सचिनचा खून झाला असून तो ऊसात पडला आहे.डोक्यात मोठी जखम होवून कवटीचा एक तुकडा पडलेला होता.तसेच त्याच्या गळयावर समोरील बाजूस जखम होवून रक्तस्त्राव येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
    या खूनाचे वृत्त समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील,पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी सदर ठिकाणी जावून परिस्थितीची पाहणी केली.अधिक चौकशी केली असता मयताचा मोबाईल काही अंतरावर ओढयात पडलेला मिळून आला. मोबाईलमधील अ‍ॅपचा अभ्यास करून सदर मयत मुलगा ड्रिम इलेव्हन हा गेम मोठया प्रमाणात खेळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले व त्याच्यातील आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून त्याचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी चौकशीसाठी विजय नामदेव वरकुटे(वय 18 वर्षे 5 महिने) याला ताब्यात घेवून चौकशी सुरु केली आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अंकुश वाघमोडे हे करीत आहेत.