A 2 to 3 day old baby was found near a drain in Jamb village of Bhandara district and started treatment at the district hospital

येथील आदिवासी भागात अनेक बोगस डॉक्टर कार्यरत असल्याने यापूर्वीही या परिसरात अनेकदा अवैध गर्भपाताच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

    बुलडाणा : बुलडाणा  जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कोलद गावातील वाण नदीपात्रात अर्भकाचे अवशेष सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गर्भपातानंतर ही अर्भकाची ही अवशेष नदीच्या पाण्यात फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आता पोलीस चौकशी सुरू करण्यात आली आहे.

    कोलद गावातील वाण नदीपात्रात मंगळवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील आदिवासी भागात आणि विशेषतः मध्यप्रदेशच्या सीमेलगत अनेक बोगस डॉक्टर कार्यरत असल्याने यापूर्वीही या परिसरात अनेकदा अवैध गर्भपाताच्या घटना उघडकीस आल्या होत्या. मात्र, आता नदीपात्रात अर्भकांचे अवशेष नदीपात्रात आढळून आल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या भागात अवैध गर्भपात करणारे एक रॅकेट सक्रिय असल्याचाही संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या अनुषंगानेही पोलीस तपास करणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील आरोग्य अधिकारींनी अद्याप काही माहिती दिली नाही आहे.

    अवैध गर्भपात करणारे एक रॅकेट सक्रिय, पोलीस चौकशी सुरू