कल्याण पादचारी पुलावर चोरट्यांची दहशत, मजुरावर हल्ला करत पैसे पळवले

कल्याणमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.भरदिवसा मारामारी, हत्या, चाकूने वार करणे या घटना सतत कल्याणमध्ये घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    कल्याणमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.भरदिवसा मारामारी, हत्या, चाकूने वार करणे या घटना सतत कल्याणमध्ये घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण पश्चिमेकडील रेल्वे पूलाजवळ सतत काहींना काही घडत असत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आणि पादचारी पुलावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.गेल्या ६ महिन्यांत कल्याण पश्चिम परिसरात अनेक गुन्हे घडले आहेत. त्यातच आणखीन एका गुन्ह्याची नोंद झाली आहे.

    कल्याण पश्चिमेकडील पादचारी पूल नेहमीच गजबवाजलेला असतो. त्यामुळे दिवसभरात इथे अनेक लोक ये जा करतात. या गर्दीचा फायदा चोरटे घेत आहेत. एका कष्टकरी मजुराला ३ चोरटयांनी कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर अडवून ठेवले. त्यानंतर चाकू हल्ला करू असा धाक दाखवत त्याच्याकडे असलेले २ हजार रुपये घेऊन चोरटे फरार झाले. खुशीराम मिना असे मजुराचे नाव आहे. या प्रकरणी आता कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे स्थानकात अश्या अनेक घटना मागील काही दिवसांपासून घडत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    खुशीराम मिना हा व्यक्ती कल्याण भिवंडी परिसरात मजुरी करून आपली उपजीविका करतो. मात्र गुरुवारी कल्याणमध्ये दिवसभर मजुरीचे काम पूर्ण करून खुशीराम मिनी हा घरी जाण्यास निघाला होता. त्यावेळी तो दरबार हॉटेल समोरील स्कायवॉकवरून भिवंडीला जाणारी रिक्षा पकडण्यासाठी गेला. स्कायवॉकवर असलेल्या १६ ते १८ या वयोगटातील तीन मुलांनी त्याची वाट अडवली. त्यानंतर चाकू हल्ला करत त्याला दुखापत केली. खुशीरामवर झालेल्या अचानक हल्ल्यामुळे तो घाबरला.

    मात्र हल्ला झाल्याने त्याने तरुणांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी मुलांनी त्याला पकडून ठेवले. त्या ३ मुलांनी खुशीराम याला मारहाण केली. तसेच त्याला चाकूने मारले आणि दिवसभर मजुरी करून मिळविलेले २ हजार रूपये घेऊन तिन्ही मुलं पळून गेली. मुलांच्या तावडीतून सुटण्यासाठी खुशीराम यांनी अनेक प्रयत्न केले पण चोरटयांनी त्यांच्याकडे असलेले पैसे पळवून नेले. खुशीराम यांची मदत करण्यासाठी प्रवासी किंवा पादचारी मदतीसाठी आले नाही. नंतर त्यानंतर कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली.