Sasurwadi Javayala Bedam Marhan, Incident at Bedona in Arvi taluka

फिर्यादीचे वडील घराच्या खालील ओपन पार्किंगमध्ये 17 जून रोजी रात्री 11.30 वाजता असताना त्यांच्या तोंडओळखीचा इसम शिवाजी इकर हा सिगारेट व गायछाप मागत होता. पण, त्यांनी देण्यास नकार दिला.

    पिंपरी :  दिघी पोलिसांनी मारहाण व तोडफोड प्रकरणी तिघांना अटक केली आहे. याबाबत सुजित मार्कंडे (वय 30 वर्षे, रा. दिघी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवाजी इकर (वय अंदाजे 40 वर्षे), सुनिल (पूर्ण नाव पत्ता माहित नाही, वय अंदाजे 25 वर्षे), आशा इकर (वय अंदाजे 35 वर्षे, सर्व राहणार दिघी) या तिघांना अटक केली आहे.
    फिर्यादीचे वडील घराच्या खालील ओपन पार्किंगमध्ये 17 जून रोजी रात्री 11.30 वाजता असताना त्यांच्या तोंडओळखीचा इसम शिवाजी इकर हा सिगारेट व गायछाप मागत होता. पण, त्यांनी देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ वाद चालू होता. हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी, त्यांचा भाऊ मनोज व आई अनारा असे गेले व शिवाजी इकरला समजावून सांगितले. पण, त्याचा राग येऊन इकरने त्याची पत्नी आशा व त्याचा मेव्हणा सुनिल हे हातात दगड व बांबू घेऊन आले.
    फिर्यादी व त्याच्या घरच्यांवर दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच, पार्किंगमध्ये असलेली होंडा कंपनीची दुचाकी व लोखंडी बाजवर दगड मारून नुकसान केले. तसेच, घराचे दरवाजाचेही नुकसान केले. या प्रकरणी तिघा आरोपींवर भा. द. वि. कलम 324, 34, 504, 506 सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.