
पोलिसांना दिलेल्या जबाबात शिझान म्हणाला,"मी आणि तुनिषा रिलेशनमध्ये होतो हे खरं आहे. पण आमची जात-धर्म वेगळा होता, आमच्या वयात खूप अंतर होतं. त्यामुळे मी तुनिषासोबतचं नातं संपवलं.
मुंबई : तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणी अभिनेता शिझान खानला (Sheezan Khan) पोलिसांनी अटक केल्यानंतर आता चौकशीदरम्यान नवे नवे खुलासे होत आहेत. तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता असं शिझानने पोलिसांना सांगितलं आहे तर, आमची जात-धर्म वेगळा होता, आमच्या वयात खूप अंतर होतं. त्यामुळे मी तुनिषासोबतचं नातं संपवलं. असंही त्यांनी त्याने ब्रेकअप करण्याच कारण सांगितलं आहे.
तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिझानने तिच्या आत्महत्या प्रकरणाबाबत वसई पोलिसांनी आजपर्यंतची महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिझानने पोलिसांना सांगितले आहे की, काही दिवसांपूर्वी तुनिषाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी त्याने तिला वाचवले होते. इतकंच नाही तर त्याने तुनिषाच्या आईलाही हे सांगितलं होतं, असा दावा त्याने केला आहे. या प्रकरणी आता पोलीस अत्यंत बारकाईने तपास करत आहेत.
आत्महत्येच्या दिवशी काय झाल?
ज्या दिवशी तुनिषाने आत्महत्या केली होती, त्याच दिवशी शेवटी तिचे काय झाले? असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तुनिषा शीजानसोबत होती अशी माहिती समोर आली आहे. तुनिषा शनिवारी सकाळी मालिकेच्या सेटवर जाण्याच्या आनंदातून घरी गेली. त्यानंतर शूट संपल्यानंतर शिझान आणि तुनिषा यांनी दुपारी ३ वाजता रूममध्ये जेवण केले. त्यानंतर 15 मिनीटानंतर ही घटना घडली.
‘या’ कारणामुळे झाला ब्रेकअप – शिझान
पोलिसांना दिलेल्या जबाबात शिझान म्हणाला,”मी आणि तुनिषा रिलेशनमध्ये होतो हे खरं आहे. पण आमची जात-धर्म वेगळा होता, आमच्या वयात खूप अंतर होतं. त्यामुळे मी तुनिषासोबतचं नातं संपवलं. पण या गोष्टीवर अद्याप पोलिसांचा विश्वास बसलेला नाही. दुसरीकडे तुनिषाच्या कुटुंबियांनी शिझानचे अनेक मुलींसोबत संबंध होते असे म्हटले आहे. त्यामुळे आता या आरोपांपासून बचाव करण्यासाठी शिझान जात, धर्म आणि वयाचं कारण देत आहे असा अंदाज वर्तवला जात आहे.