एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा विद्यार्थ्यांना फटका, बारावीच्या परीक्षा सुरु ; बस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे होत आहेत हाल

आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षा होते आहे. या परीक्षेसाठी राज्यात एकूण 14,85,826 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.आज पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे.

    यवतमाळ : बारावी बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. परीक्षेसाठी ज्या ठिकाणी शाळा आहे. त्याच ठिकाणी परीक्षा केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 34 हजार 254 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. गेल्या वर्षी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ऑफलाइन पध्दतीने परीक्षा होत आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने परीक्षा देण्यासाठी पोहचले.

    आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षा होते आहे. या परीक्षेसाठी राज्यात एकूण 14,85,826 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.आज पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. यामुुळे असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने परीक्षा देण्यासाठी पोहचले आहेत.