दोन भावांनी मिळूुन बहिणीच्या लिव्ह इन पार्टनरची केली हत्या; हातोड्याने वार करत घेतला जीव, मृतदेह नदीत फेकून दिला!

बहीणीसोबत भांडण केल्यानंतर शाहबाज आपल्या एका मुलासह टीटवाला येथील आई-वडिलांच्या घरी जाण्यासाठी घरातून निघून गेला होता. वाटेत शोएब आणि इर्शादने त्यांचा मित्र हेमंतने शाहबाज पकडले आणि जबरदस्तीने सोबत घेऊन गेले. यानंतर आरोपींनी शाहबाजचा हातोड्याने वार करून खून करून मृतदेह कल्याणमधील उल्हास नदीत फेकून दिला.

  ठाणे : राज्यात गुन्हे घडण्याचं प्रमाण थांबताना दिसत नाही आहे. दिवसेंदिवस हत्यासारखे गंभीर गुन्हे घडताना समोर येत आहे. कल्याणमधून  (Kalyan Crime News) असचं एक प्रकरण समोर आलं आहे. दोन भावांनी मित्राच्या मदतीने आपल्या बहिणीच्या लिव्ह इन पार्टनरचा हातोड्याने मारुन खून केला. (brother killed sister live in partner) हत्येनंतर तिघांनी मृतदेह उल्हास नदीत फेकून दिला. मृतदेह अद्याप सापडला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शोएब शेख, इर्शाद शेख आणि त्यांचा मित्र हेमंत बिच्छवडे अशी आरोपींची नावे आहेत.

  बहिणीशी भांडण केल्याचा रागात हत्या

  मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शोएब आणि इर्शादची बहीण मुमताज शाहबाज शेख (25) नावाच्या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि दोघांना दोन मुलेही होती. मुमताजचा घटस्फोट झाला आहे. शुक्रवारी शहाबाज घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी कल्याणमधील खडकपाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली.

  पोलिसांनी  मुमताजचे दोन भाऊ शोएब आणि त्यांचा मित्र इर्शादला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली असता तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने सांगितले की, त्याच्या बहिणीचा लिव्ह इन पार्टनर शाहबाज शेख त्याच्या बहिणीशी अनेकदा भांडण  करत असे. तसेच त्याची बहीण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याने त्याचे कुटुंबीय शाहबाजवर नाराज होते. या रागातून त्यांनी शाहबाजवा संपवलं.

  हातोड्याने वार करत हत्या

  बहीणीसोबत भांडण केल्यानंतर शाहबाज आपल्या एका मुलासह टीटवाला येथील आई-वडिलांच्या घरी जाण्यासाठी घरातून निघून गेला होता. वाटेत शोएब आणि इर्शादने त्यांचा मित्र हेमंतने शाहबाज पकडले आणि  जबरदस्तीने सोबत घेऊन गेले. यानंतर आरोपींनी शाहबाजचा हातोड्याने वार करून खून करून मृतदेह कल्याणमधील उल्हास नदीत फेकून दिला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यावर पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले असून पोलिसांचे पथक मृतदेहाचा शोध घेत आहे.