
इस्लामपुरात काल रात्रीच्या सुमारास दोन गटात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यानंतर दोन्ही गटातली लोकांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवता केली. या घटनेत तब्बल 22 जखमी झाले आहेत.
सांगली : सांगलीच्या इस्लापुरात शुक्रवारी संध्याकाळच्या समारास दोन गटामध्ये तुफान राडा झाला. जुन्या बाबीवरुन सुरू झालेला हा वाद वाढत गेला अणि त्याचं पर्यवसन मारहाणीत झालं. यामध्ये दोन्ही गटांतील २२ जण जखमी झाले. या प्रकरणी सध्या पोलिसांनी दोन्ही गटांच्या 76 जणांविरुद्ध गंभीर दुखापतीसह एकमेकांच्या घरावर चाल करून जात नासधूस करणे आणि बेकायदा जमाव जमवून गर्दी मारामारी केल्याचे गुन्हे पोलिसांनी नोंद केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीमधील (Sangli Crime) इस्लामपूर शहरातील (Islampur) माकडवाले गल्लीत ही घटना घडली आहे. विनोद पवार हा तरुण त्याच्या काही इतर मित्रांसोबत परिसरात फिरत होता. यावेळी परिसरातीलच काही तरुणांनी बेकायदा गर्दी जमवून त्याच्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात विनोदसह साहिल कुचीवाले, यल्लप्पा अन्नाप्पा कुचीवाले, संदीप जाधव, राकेश जाधव, गणेश गुळके, सविता कुचिवाले, सुधीर कुचिवाले, प्रशांत कुचिवाले, पूजा कुचिकोरवी असे 10 जण जखमी झाले आहेत. तर,
दशरथ पवारने या तरुणानेही सांगितले की, तो इतर 12 जणांसमवेत परिसरात बसला होता. यावेळी विनोद पवार 38 जणांचा बेकायदा जमाव घेऊन चालून आला. या सर्वांनी घरांव दगडफेक करीत नुकसान केले. या हल्ल्यात संतोषी पवार, यल्लप्पा कुचिवाले, रवींद्र कुचिवाले, सुरेश कुचिवाले, संदीप कुचिवाले, विनोद कुचिवाले, पूजा कुचिवाले, प्रमोद कुचिवाले, यल्लव्वा कुचिवाले, निकित कुचिवाले, अंकिता कुचिवाले आणि अनिकेत कुचिकोरवी असे 12 जण जखमी झाले. या दोन्ही गुन्ह्यांचा इस्लामपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी स्वतंत्रपण तपास करीत आहेत.