शेतावरून परतणाऱ्या दोन महिलांना टेम्पोने चिरडले; चुलती-पुतणीच्या मृत्यूने हळहळ

चुलती-पुतणी शेतातून मजुरी करून घराकडे पायी परतत होत्या. साकेगावहून मनूरकडे जाणाऱ्या टेम्पोने (एमएच २१ डी ९११६) त्यांना जोराची धडक दिली. या घटनेत दोघीही चिरडून जागीच ठार झाल्या. अपघातानंतर चालकाने वाहन जागेवर सोडून पोबारा केला.

    संभाजीनगर : शेतातून मजुरी (Farm Labour) करून घरी परतणाऱ्या दोन महिलांना (Women Death) भरधाव जाणाऱ्या टेम्पोने चिरडले (Crush By Tempo). अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही महिला नात्याने चुलती-पुतणी होत्या. संभाजीनगर (Sambhaji Nagar) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ही घटना असून, ठगनबाई विश्वनाथ दवंगे (५६), मंगल आसाराम दवंगे (३८, दोघी रा. मनूर) असे मृत चुलती-पुतणीचे (Death Of Cousin And Nephew) नावे आहेत.

    चुलती-पुतणी शेतातून मजुरी करून घराकडे पायी परतत होत्या. साकेगावहून मनूरकडे जाणाऱ्या टेम्पोने (एमएच २१ डी ९११६) त्यांना जोराची धडक दिली. या घटनेत दोघीही चिरडून जागीच ठार झाल्या. अपघातानंतर चालकाने वाहन जागेवर सोडून पोबारा केला.

    मयत झालेल्या ठगणबाई दवंगे यांच्या पतीचे यापूर्वी निधन झालेले आहे. त्यांना दोन अविवाहित मुले आहेत. अत्यंत गरीब परिस्थिती असल्याने त्या मोलमजुरी करून मुलांचे पालनपोषण करीत होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे वडिलांनंतर आईचेही छत्र हरविल्याने दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. तर अपघातातील दुसरी मयत महिला मंगलबाई दवंगे यांना पती नांदवत नसल्याने त्या माहेरी राहून मोलमजुरी करीत होत्या.