दोन वर्षांपूर्वी श्रद्धाने हत्येची भीती व्यक्त केली होती, पोलिसांत केली होती तक्रार

पालघर पोलिसांना लिहिलेल्या पत्रात श्रद्धाने आफताबने तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत सांगितले होते.

  नवी दिल्ली : सध्या दिल्लीतील श्रद्धा वालकर (Shraddha walkar Murder Case) हत्या प्रकरण चांगलच गाजतयं. नकतचं श्रद्धाचा मारेकरी आरोपी आफताबने (Aftab Poonawala) तिची हत्या केल्याची कबुली कोर्टाला दिली. तर दुसरीक़डे पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांकडे आफताबविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती आता समोर आली आहे. 

  मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांकडे आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. श्रद्धाने मुंबई पोलिसांना पत्र लिहून आफताब तिला मारहाण करत असल्याचं सांगितलं होतं. तसेच पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही तर त्याला जीवे मारणार अशीही भीतीहि व्यक्त केली होती. 

  पालघर पोलिसांत केली होती तक्रार

  पालघर पोलिसांना लिहिलेल्या पत्रात श्रद्धाने आफताबने तिच्यावर होत असलेल्या  अत्याचाराबाबत सांगितले होते. आफताबने तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला जीवे मारून तुकडे करून टाकण्याची अशी धमकी दिल्याचही सांगितलं. 

  सुनियोजित कटानुसार पुरावे नष्ट केले

  आरोपी आफताब पूनावालाने श्रध्दाची हत्या केल्यानतंर सुनियोजित कट अंतर्गत पुरावे नष्ट केले. श्रध्दाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेली हत्यारे त्याने अशा प्रकारे फेकून दिली की ती अदयाप पोलिसांना सापडली नाहीत. आरोपींनी गुरुग्राममधील डीएलएफजवळील जंगलात करवत आणि ब्लेड फेकले होते. आफताब गुरुग्राममध्ये ज्या कॉल सेंटरमध्ये काम करायचा तेथील कर्मचाऱ्यांना आता वर्क फ्रॅाम होम देण्यात आले आहे.

  कोर्टासमोर दिली हत्येची कबुली

  साकेत कोर्टासमोर हत्येची कबुली देताना आरोपी आफताब पूनावालानं न्यायालयात सांगितलं की, “ही घटना क्षणार्धातच घडली.  तपासात सहकार्य करत असल्याचंही तो बोलला. मात्र, त्याला  ही घडलेली घटना नीट आठवत नसल्याचंही म्हणाला.