विकास मालूने आपल्यावरील आरोपांवर अखेर मौन सोडलं! सतीश कौशिक यांच्या मृत्यूला जबाबदार धरल्यावर बघा काय म्हणाले?

'माझे सतीशजींसोबत गेल्या 30 वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत आणि माझ्यावर चिखलफेक करायला या जगाला काही मिनिटेही लागली नाहीत. असं विकास मालु यांनी म्हण्टलं आहे.

अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे प्रकरण (satish kaushik Death) आता केवळ हृदयविकाराच्या झटक्याने मर्यादित राहिलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आता या प्रकरणात आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. एका महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे. महिलेने दिल्ली पोलिसांना तक्रार पत्र दिले असून, त्यात तिने सतीश कौशिकची हत्या झाल्याचा दावा केला आहे. ही महिला सतीश कौशिक यांची मैत्रीण आणि व्यापारी विकास मालूची पत्नी आहे. पत्नीच्या आरोपानंतर सतीश मालू यांनी आपला खुलासा केला आहे.

विकास मालुच्या पत्नीचे आरोप

विकास मालूच्या पत्नीने 15 कोटींच्या वादातून सतीश कौशिकची हत्या केल्याचा दावा केला आहे. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी तिच्या पतीने सतीश कौशिक यांच्याकडून 15 कोटी रुपये घेतले होते, परंतु ते परत करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. या वादातून त्यांनी ही हत्या केली आहे. पत्नीच्या या आरोपांवर विकास मालू यांनी मौन सोडलं असुन. फार्महाऊसवर झालेल्या पार्टीतील सतीश कौशिकचा डान्स व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये ते गायक यो यो हनी सिंगच्या ‘इंग्लिश बीट’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे, तसेच उद्योगपती विकास मालू आणि इतरही आहेत. हा व्हिडिओ दिल्लीत झालेल्या होळी पार्टीचा आहे. या पार्टीदरम्यान सतीश कौशिक यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तिथे अभिनेत्याचा मृत्यू झाला.

काय म्हणाले विकास मालु

विकास मालूने पत्नीच्या आरोपांना उत्तर देताना सोशल मीडियावर लिहिले की, ‘माझे सतीशजींसोबत गेल्या 30 वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत आणि माझ्यावर चिखलफेक करायला या जगाला काही मिनिटेही लागली नाहीत. नाव या घटनेनंतर घडलेली शोकांतिका मी सहन करू शकत नाही. मला एवढेच सांगायचे आहे की शोकांतिका सांगून कधीच येत नाही आणि त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. मी मीडियाला विनंती करू इच्छितो की प्रत्येकाच्या भावनांचा आदर करावा. मला प्रत्येक उत्सवात सतीशजींची आठवण येईल.