विक्रोळीच्या कन्नमवार नगरात शाळेतील मुलांचे अपहरण झाल्याच्या अफवेने भीतीचे वातावरण

शाळेतील मुलांचे अपहरण झाल्याच्या अफवेने पालकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घबराट निर्माण झाली आहे. मात्र मुलांच्या अपहरणाबाबत पोलीस ठाण्यात (police thane) आतापर्यंत कोणतीही तक्रार आली नसून, मुलांचे अपहरण झाल्याची अफवा असल्याचे विक्रोळीच्या कन्नमवार नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा चव्हाण यांनी म्हटले आहे.

    मुंबई : मुंबईत काही महिन्यापूर्वी मुलांना (Childerns) पळविणारी टोळी (Gang) सक्रीय असल्याचे बोललं जात होते. यामुळं शाळेतील मुलांमध्ये (School Childerns)  तसेच पालकांमध्ये (parents) भीताचे वातावरण होते. दरम्यान, या पाशर्वभूमीवर पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याची अफवा समोर आली आहे. विक्रोळीच्या कन्नमवार नगरात (Kannamwar town of Vikhroli) शाळेतील मुलांचे अपहरण झाल्याच्या अफवेने पालकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घबराट निर्माण झाली आहे. मात्र मुलांच्या अपहरणाबाबत पोलीस ठाण्यात (police thane) आतापर्यंत कोणतीही तक्रार आली नसून, मुलांचे अपहरण झाल्याची अफवा असल्याचे विक्रोळीच्या कन्नमवार नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा चव्हाण यांनी म्हटले आहे.

    दरम्यान, विक्रोळीतील कन्नमवार नगर (Kannamwar Nagar) हीच विक्रोळीची मुख्य ओळख. या नगरात तब्बल २६० इमारती आहेत. गेल्या काही दिवसापासून कन्नमवार नगरात तीन मुलांचे अपहरण झाल्याची चर्चा सोशल मिडियावरून सुरू होती. त्यामुळे पालक भयभीत झाले होते. सद्या मुलांना शाळेत पाठविताना पालक काळजी घेत आहेत. मागील काही दिवसांपासून मुले गायब झाल्याची, मुलांच्या अपहरणाची चर्चा प्रत्येक घराघरात सुरू आहे. विक्रोळीमध्ये मुले पळविणारी टोळी फिरत असल्याच्या चर्चेने पालकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. पण पालकांनी घाबरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.