
कोणीतरी तिच्या पतीला मारून पळून गेल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. मात्र, पोलिसांना महिलेच्या बोलण्यावर संशय आल्यानंतर पोलिसांनी तिची कडक चौकशी केली. अखेर तिने हत्या केल्याची कबुल केलं.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. रोज रोजच्या भांडणाला कंटाळून पत्नीने तिच्या पतीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर घराच्या बाहेर येऊन कुणीतरी घरात येऊन पतिला मारुन घेल्याची बतावणी केली. मात्र, चौकशी दरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच तिने खून केल्याची कबुली दिली.
येथे एका महिलेने आपल्या मद्यधुंद पतीची निर्घृण हत्या केली. यानंतर हत्येचे रहस्य लपवण्यासाठी आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी ती घराबाहेर पडली आणि माझ्या पतीला मारून काही लोक पळून गेल्याची ओरड करू लागली.
बाराबंकीमध्ये जिल्ह्यातील पिरपूर पोलीस ठाण्या अंतर्गत ही घटना घडल्याची माहिती आहे. येथील रहिवासी राम औसन रावत यांचा मुलगा विनय राज (२८ वर्षे) याच्या घरी काही नातेवाईक आले होते. घरात दारुपार्टी झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये काही वाद झाला. नेहमी होत असलेल्या वादाला कंटाळून महिलेने दारूच्या नशेत विनय राजच्या लाकडी दाड्यांने डोक्यात वार करत हत्या केली.
हत्यानंतर घरातून बाहेर येत करू लागली आरडाओरडा
पतीचा खून केल्यानंतर तीने घराबाहेर येत आपल्या पतीला कोणीतरी मारले आहे, असं सांगत जोरजोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर चौकशी सुरु केली.
घटनास्थळी आढळली लाकडी दांडा
पोलिसांना घटनास्थळी रक्त आणि खुनात वापरलेली दांडाहीआढळून आला. तर महिलेचे कपडेही रक्ताने माखल्याचे निर्दशनास आलं. कोणीतरी तिच्या पतीला मारून पळून गेल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. मात्र, पोलिसांना महिलेच्या बोलण्यावर संशय आल्यानंतर पोलिसांनी तिची कडक चौकशी केली. अखेर तिने हत्या केल्याची कबुल केलं. मृतकाच्या भावाच्या तक्रारी नंतर आता महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.