नवऱ्याने चहा मागितला, संतापलेल्या बायकोनं थेट नवऱ्याच्या डोळ्यातच खुपसली कात्री!

पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरुन वाद होतात. पण अनेकदा हा वाद विकोपाला जातो अन् हिंसाचारात रुपांतर होतं. उत्तर प्रदेशमध्ये नवरा बायोकाचा वादही असाच विकोपाला गेला.

    पती पत्नीमध्ये अनेकदा किरकोळ कारणावरुन वाद होतात. कधी घरातल्या कामावरुन तर कधी स्वंयपाकावरुन भांडण होणं ही सामान्या बाब आहे. मात्र, अनेकदा हीचं सामान्य वाटणारी भाडणं कधी कधी गंभीर स्वरुप घेते.  आणि याचं गुन्ह्यामध्ये रुपातंर  होताना दिसतं. असाचं काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधून समोर आलं आहे. पतीने पत्नीला चहा बनवण्यास सांगितले मात्र, पत्नीने नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की संतापलेल्या पत्नीने थेट पतीच्या डोळ्यातच कात्री खुपसली. या प्रकरणी प्रियंकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे

    नेमका प्रकार काय?

    उत्तर प्रदेशमधील बडोली रोड येथे ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.  येथील अंकीत आणि प्रियंका  या जोडप्यामध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. त्यांच्यामध्ये नेहमीचं वाद होत होते. घटनेच्या दिवशी अंकीतने पत्नी प्रियंकाला चहा बनवण्यास सांगितलं. मात्र, प्रियकांने चहा बनवण्यास नकार दिला. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. हा वाद इतका वाढला की  पत्नीने रागाच्या भरात थेट पतीच्या डोळ्यातच कात्री खुपसली. सध्या या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.

    पत्नी फरार

    मिळालेल्या माहितीनुसार, पतीने पत्नीकडून चहा मागितला. पत्नीने चहा देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून पत्नीने पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसली. पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसल्यानंतर पतीला रक्तबंबाळ अवस्थेत टाकून पत्नी फरार झाली आहे. याप्रकरणी पती अंकितने पत्नी प्रियंकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बरुत पोलिसांनी प्रियांकाविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. तसंच, तिचा शोधही सुरू करण्यात आला आहे