Unnatural Sex साठी पतीचा हट्ट, संतापलेल्या पत्नीने प्रायवेट पार्टचा घेतला चावा; पतीची मृत्यूशी झुंज!

या प्रकरणामध्ये पोलीस पुढील तपास करत असून त्यांनी 2 वेगवेगळ्या गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. सदर प्रकरणामध्ये पतीची अवस्था पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.

    पती पत्नीचं भांडण अनेकदा विकोपाला जाऊन गंभीर गुन्ह्याचं स्वरुप घेतं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधील हमिरपूरमधून उघडकीस आल आहे. येथील पती सतत अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करत होता. त्याच्या या मागणीला कंटाळुन पत्नीने त्याच्या प्रायवेट पार्टचा चावा (Women Bites Her Husbad Private Part)घेतला. यामुळे पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. नाव रामू निषाध (वय, 34)असं जखमी पतीचं नाव आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

    अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्यासाठी करत होता मागणी

    मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती तिला अनेक दिवसापासून अनैसर्गिक शरीरसंबध ठेवण्याची मागणी करत होता. ती नेहमी नकार देत होती. यावरुन त्यांच्यात नेहमी वाद होत होते.घटनेच्या दिवशीही ( 28 जानेवारी) त्यांच याच कारणावरुन भांडण झालं. यावेळी संतापलेल्या पत्नीनं थेट त्याच्या प्रायवेट पार्टचा कडकडून चावा घेतला. घटेनंतर त्याला रुग्णालायच दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा हल्ला इतका जबर होता की या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून या व्यक्तीला दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

    पत्नीवर गुन्हा दाखल

    या प्रकरणामध्ये भारतीय दंडसंहितेमधील कलम 326 अंतर्गत पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणीवपूर्वकपणे एखाद्याला दुखावण्याच्या आरोपाखाली या कलमाअंतर्गत कारवाई होते. तसेच कलम 506 अंतर्गत गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.